Claim:
BBCच्या पत्रकाराला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी केली अटक.
ये देखिये बीबीसी BBC कयूं उल्टा चलता है व इसका रिपोर्टर चरस ले जाते पकड़े जाते हैं जम्मू काश्मीर में pic.twitter.com/iJopAXdRvS
— ॐ V K SHARMA ॐ (@VictoriousNamo) October 29, 2019
Verification:
सोशल मिडियात एक व्हिडिओ शेअर केला जात आहे। या व्हिडिओत जो युवक दिसत आहे तो बीबीसीची रिपोर्टर आहे. त्याला पोलिसांना त्याच्याजवळ ड्रग्स आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. व्हिडिओ हा इसम एक बीबीसी लिहिलेले आयडी कार्ड देखील दाखवताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा फक्त आवाज ऐकू येतोय आणि तो दुस-या व्यक्तीला विचारतोय की तो कोण आहे आणि त्याच्याकडून काय जप्त केले आहे. उत्तरादाखल तो दुसरा व्यक्ती सांगतो मी बीबीसीचा रिपोर्टर आहे आणि माझ्याकडून चरस जप्त करण्यात आलं आहे. हे विकण्यासाठी नाही तर स्वत: साठी घेऊन चाललो होतो. फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूब वर अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

बीबीसीचे स्पष्टीकरण-
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचा बीबीसीशी कसलाही संबंध नाही. पाकिस्तानात बीबीसीच्या नावाचा गैरवापर करण्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. ब्रॅंड प्रवर्तन विभागाला पण याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम्हाला बीबीसीच्या नावाने गैरप्रकार करणा-यांच्या विपरोधात कारवाई होण्याची आशा आहे. मला या प्रकरणाविषयी माहिती नाही पण मला वाटते की पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसावा. कारण त्याने आपली ओळख सांगितली ती पूर्णपणे खोटी निघाली – महविश हुसेन, एडिटर, BBC उर्दू
यावरुन स्पष्ट होते की सोशल मिडियात व्हायरल होणारा व्हिडिओ पाकिस्तानातील आहे आणि यात दिसणारा व्यक्ती बीबीसीचा रिपोर्टर देखील नाही.
Tools Used:
- Direct Contact
Result: False
(जर आपणास आमच्या लेखात काही त्रुटी आढळून आली किंवा एखादा संदेश किंवा बातमी सदंर्भात संभ्रम वाटत असेल तक योग्य माहिती मिळवण्यासाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर मेल करु शकता)