Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiपुण्याच्या कुरकुंभमध्ये केमिकल कंपन्यांत झाले नाहीत भीषण स्फोट,  सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल

पुण्याच्या कुरकुंभमध्ये केमिकल कंपन्यांत झाले नाहीत भीषण स्फोट,  सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

पुणे सोलापूर हायवे वरील कुरकुंभ एमआयडीसीत  दोन केमिलकल कंपन्यांत भीषण स्फोट, वाहतूक बंद, जवळील गावे रिकामी करण्यात येत आहेत. 20 किलोमीटरपर्यंत सतर्कतेचा इशारा.

Verification
सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये स्फोटाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दावा करण्यात येत आहे कि पुणे सोलापूर हायवेवरील वाहतुक बंद झाली असून कुरंकुंभ एमआयडीसीतील दोन केमिकल कंपन्यांत भीषण आग लागली आहे. शेजारील गावे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. 20 किलोमीटरपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाटस टोलनाका बंद आहे.
आम्हाला फेसबुकर देखील हाच दावा असणारी फेसबुक पोस्ट आढळून आली.
इतरही युजर्सनी ही पोस्ट  शेयर केली आहे.
आम्ही व्हायरल होत असलेल्या पोस्टची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला मागील वर्षीच्या आॅगस्ट महिन्यातील अनेक बातम्या आढळून आल्या.
लोकसत्ताच्या वेबसाईटवर त्यावेळी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार कुरकुंभ एमआयडीसीतील अल्कली अमाईन्स कंपनीला रात्रीच्या वेळी आग लागली होती. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. या आगीने काही मिनिटात रौद्र रुप धारण केले असून बाजूच्या कंपन्यांना देखील या आगीच्या झळा बसल्या.
लोकसत्ता आणि इतर वर्तमानपत्राच्यां बातमीनुसार ही आग 14 आॅगस्ट 2019 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लागली. मात्र व्हायरल व्हिडिओत ही आग दिवसा लागली असल्याचे दिसत आहे. तु्म्ही खाली फोटो पाहू शकता.
यावरुन हेच स्पष्ट होते केमिकल कंपनीतील स्फोटाचा हा व्हिडिओ कुरकुंभ एमआयडीसीतील नाही. आम्ही याबाबत अधिक खात्री करण्यासाठी एमआयडीसीतील फायर स्टेशनशी थेट संपर्क साधला असता सध्या अशी कोणतीही स्फोटाची घटना घडली नसल्याची माहिती मिळाली याशिवाय आम्हाला दैनिक प्रभात या वेबसाईटवर कुरंकुंभ एमआयडीसीत स्फोटाची अफवा पसरली असल्याची बातमी आढळून आली. या बातमीत दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांची प्रतिक्रिया दिली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोटाचा नाही. सध्या अशी कोणतीही घटना कुरकुंभमध्ये घडलेली नाही. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने व्हिडिओ व्हायरल करुन खोटी माहिती शेअर केली जात आहे.
 Tools Used
Google Keyword Search
Facebook Search
Direct contact
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular