Verification–
आमच्या एका वाचकाने आम्हाला व्हाट्सअॅप वर एक मॅसेज सोबत व्हिडिओ पाठवला असून याची पडताळणी करण्यास सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस काही युवकांवर भर रस्त्यात लाठीचार्ज करताना तसेच बैठक काढण्यास लावत असल्याचे दिसत आहे. मॅसेजमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेश पोलिस एक शहरात दगडफेक करणा-या लोकांवर लाठीचार्ज करत आहेत, पकड़लेेले सगळे लोक मुस्लिम आहेत. कृपया या व्हिडिओची पडताळणी करा.
आम्ही व्हायरल व्हिडिओसंबंधी पडताळणी सुरु केली पण उत्तरप्रदेश पोलिसांनी अशी कारवाई केल्याची बातमी कुठेही आढळून आली नाही. यानंतर आम्ही बारकाईने हा व्हिडिओ पाहिला, एका ठिकाणी आम्हाला पोलिस युवकांना घेऊन उभे असताना त्यांच्या पाठीमागे विजय टेन्ट हाऊस असा बोर्ड दिसला.
गूगल मध्ये शोध घेतला असता विजय टेन्ट हाऊस इंदोरमध्ये असल्याचे आढळून आले. याशिवाय व्हिडिओमध्ये भिंतीवर श्री माहेश्वरी उ. मा विद्यालय लिहिले दिसले ते ही इंदोरमध्येच असल्याचे गूगल शोधावरुन समोर आले.
यानंतर आम्ही गूगलमध्ये Indore Cops Beat youth In Public ह्या कीवर्ड्सच्या साहाय्याने शोध घेतला असता एबीपी न्यूजच्या बातमीचा व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ 29 मे 2015 रोजी यूट्यूब वर अपलोड करण्यात आला आहे.
बातमीनुसार मध्यप्रेदशातील इंदोरमध्ये वाढत्या गुन्हांना लगाम लावण्यासाठी पोलिसानी तालिबानी रुप धारणे केले। पोलिसांनी गुंडांची परेड काढली तसेच उठाबशा काढायला लावल्या. मागील महिन्यापासून आतापर्यंत 15 पोलिस ठाण्यातून गुंडांच्या 50 परेड काढण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय आम्हाला आज तक या हिंदी वृत्तवाहिन्याच्या बातमीचा देखील व्हिडिओ मिळाला. यात देखील हीच माहिती देण्यात आली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ हा उत्तर प्रदेशा पोलिसांनी दगडफेक करणा-यांवर केलेल्या लाठीचार्जचा नाही तर चार वर्षापूर्वी इंदोर पोलिसांनी गुंडांवर केलेल्या लाठीचार्जचा आहे. तो आजच्या संदर्भात व्हायरल करुन भ्रम निर्माण केला जात आहे.
Sources
Google Search
Youtube Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)