Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiसोशल मिडियात महाराष्ट्र पोलिसांच्या नावाने व्हायरल झाला लुधियाना पोलिसांचा महिला सुरक्षा हेल्पलाईन...

सोशल मिडियात महाराष्ट्र पोलिसांच्या नावाने व्हायरल झाला लुधियाना पोलिसांचा महिला सुरक्षा हेल्पलाईन नंबर

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim
 
महाराष्ट्र में नई सरकार ने पुलिस को दिया आदेश। रात के समय अकेली महिलाओं को घर तक  सुरक्षित पहुंचने के लिए वाहन उपलब्ध होने जारी किया हेल्पलाइन नंबर। यह सेवा निशुल्क है। 
 
मराठी अनुवाद- महाराष्ट्रातील नव्या सरकारचे पोलिसांना आदेश. रात्रीच्या वेळी एकट्या महिलेला घरापर्यंत पोहचवण्यासाठी वाहन मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. ही सेवा निशु्ल्क आहे. 
 
 
Verification– 
 
हैद्राबाद सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणानंतर देशभरात महिलांची सुरक्षा याची जास्त चर्चा होऊ लागली आहे. सोशल मिडियात सुद्धा महिलांच्या सुरक्षेसंबंधी अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. तर महिलांच्या मदतीसाठी काही हेल्पलाईन नंबर देखील शेअर केले जात आहेत. अशीच एक हिदी पोस्ट आम्हाला ट्विटर वर मिळाली ती आम्ही अनुवादित केली आहे. 
 
महाराष्ट्र पोलिसांनी एकट्या महिलासांठी सुरक्षेच्या दृष्टीने मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे . एकटी महिला रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी जर वाहन शोधू शकत नसेल तर ती पोलिस हेल्पलाइन नबर (1091 आणि 7837018555) या नंबरवर काॅल करु शकते। ही हेल्पलाइन 24×7 काम करेल. नियंत्रण कक्षातील वाहन किंवा जवळील पीसीआर वाहन किंवा एसएचओ वाहन त्या महिलेला सुरक्षितपणे तिला तिच्या ठिकाणी पोहचवेल. ही सेवा निशुल्क आहे. हा संदेश सगळ्यांना पाठवा, कृपया नंबर सेव्ह करा. 
 
महाराष्ट्र पोलिसांनी असा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे का याबाबत आम्ही पडताळणी करण्याचे ठरविले. शोध सुरु केला असता आम्हाला या हेल्पलाईन नंबर विषयीच्या ब-याच पोस्ट आढळून आल्या मात्रा यातील दावे मात्र वेगवेगळे होते. कुणी हा नंबर गोवा पोलिस तर कुणी कोलकाता तर कोणी महाराष्ट्र पोलिसांचा असल्याच्या पोस्ट लिहिल्या होत्या. 
 
 
शोध सुरु ठेवला असता फेसबुक वरच आणखी एक पोस्ट आढळून आली यात हा नंबर पंजाबमधील लुधियाना पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सुरु केल्याचे म्हटले होते शिवाय पोस्टमध्ये यासोबत लुधियाना केसरी नावाच्या वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण देखील जोडले होते. 
 
 
या शिवाय आम्हाल दी ट्रिब्युन या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर हीच बातमी आढळून आली. बातमी म्हटले आहे- लुधियाना पोलिसांनी महिलांसाठी हेल्पलाईन नंबरची सेवा सुरू केली आहे महिला या हेल्पलाइनवर काॅल करुन वाहनाने घरापर्यंत सोडण्याची विनंती करु शकतात. बातमीत पुढे लिहिले आहे कि पोलिस आयुक्त राकेश अग्रवाल यांनी म्हटले कि आम्ही लुधियानात महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरु केले आहेत. आमच्याकडे महिलांसाठी दोन हेल्पलाईन नंबर आहेत आणि हे 24X7 सुरु आहेत. लुधियाना मोफत प्रवासासाठी महिला हा नंबर डायल करु शकतात.
 
 
यावरुन स्पष्ट झाले की हा नंबर महाराष्ट्र किंवा कोलकाता पोलिसांचा नाही तर लुधियाना पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी सुरु केलेला हेल्पलाईन नंबर आहे. यानंतर आम्ही 1901या नंबरची पडताळणी केली असता हा नंबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईनचा असल्याचे आढळून आले. 
 
 
यानंतर आम्ही महाराष्ट्र पोलिसांनी महिलासांठी महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबरची सेवा सुरु केली आहे की नाही याची शोध सुरु ठेवला असता एएनआयची बातमी मिळाली. याबातमीत नागपुर पोलिसांनी अशी सेवा सुरु केल्याची महिती मिळाली. याशिवाय नागपुर पोलिसांचे ट्विट देखील मिळाले. 
 
 
 
 या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या हेल्पलाईनचा नंबर 1091 हा देखील शेअर करण्यात आला आहे मात्र मोबाईल नंबर वेगळा आहे. शिवाय आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचे देखील एक ट्विट आढळून आले यात म्हटले आहे कि 100 हा नंबर डायल करुन कुणीही केव्हाही मंदत मागू शकते हे सगळ्यांसाठी आहे. 
 
 
 
यावरुवन हेच स्पष्ट होते की लुधियाना पोलिसांचा हेल्पलाईन नंबर महाराष्ट्र पोलिसांच्या नावाने शेअर होतोय. महाराष्ट्र पोलिसांनी 100 नंबर शिवाय कोणताही नवा नंबर सुरु केलेला नाही. सोशल हैद्राबाद प्रकरणानंतर सोशल मीडियात अनेक वेळा चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्या किंवा पोस्ट पासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 
 
Tools Used 
 
  • Twitter Advanced Search
  • Google Keyword Search 
  • Facebook Search 
 
Result- Misleading
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular