Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

HomeMarathiभाजप आमदाराने मुंबईत नमाजसाठी लावलेले बॅरिकेड्स हटविले? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य 

भाजप आमदाराने मुंबईत नमाजसाठी लावलेले बॅरिकेड्स हटविले? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य 

Authors

भाजप आमदाराने मुंबईत नमाजसाठी लावलेले बॅरिकेड्स हटविले असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात आमदार पोलिसांची हुज्जत घालताना दिसत आहे. 

मुंबईतील कांदिवली येथे ‘नमाज’साठी शिवसेनेने रस्ता बंद केल्याच्या विरोधात भाजप आमदार योगेश सागर यांना आक्षेप घेत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सागर एक बॅरिकेड्स ढकलून पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत.

भाजप आमदार

फेसबुक पोस्ट इथे पहा.

हा दावा ट्विटरवर देखील व्हायरल झाला आहे.

गेल्या वर्षी गुरुग्राममध्ये उजव्या विचारसरणीच्या गटांकडून खुल्या ठिकाणी शुक्रवारच्या ‘नमाज’मध्ये व्यत्यय आणण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले होते, “आम्ही उघड्यावर नमाज अदा करण्याची प्रथा सहन करणार नाही” आणि या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याची आशा व्यक्त केली.

गुरुग्राममधील नवाझ वाद गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अलीकडील घडामोडीत, सर्वोच्च न्यायालयाने माजी राज्यसभा सदस्य मोहम्मद अदीब यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली आहे, ज्यात गुरुग्राममधील उजव्या विचारसरणीच्या गटांद्वारे शुक्रवारच्या ‘नमाज’ व्यत्ययांवर हरियाणा सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याचिकेनुसार, शुक्रवारच्या नमाजच्या आसपासच्या घटना काही “ओळखण्यायोग्य गुंडांच्या इशार्‍यावर घडल्या आहेत, जे धर्माच्या नावाखाली स्वतःचे खोटे चित्रण करतात आणि संपूर्ण शहरातील एका समुदायाविरूद्ध द्वेष आणि पूर्वग्रहाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.”

Fact Check/Verification 

भाजप नेते योगेश सागर यांनी ‘नमाज’साठी रस्ते बंद केल्याबद्दल शिवसेनेचा निषेध केल्याच्या व्हायरल दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी न्यूजचेकरने ‘सागर योगेश कांदिवली’ या कीवर्डसह व्हिडिओच्या कीफ्रेमचा वापर करून Google रिव्हर्स इमेज सर्च करण्यास सुरुवात केली असता भाजप आमदार योगेश सागर यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावर 16 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर केलेल्या पोस्टची लिंक आढळून आली.

पोस्टमध्ये व्हायरल व्हिडिओत कॅप्शनसह स्पष्ट केले आहे की क्लिपचा ‘नमाज’शी कोणताही संबंध नाही. त्यांनी लिहिले, “MVA ने पोलिस बळाचा गैरवापर करणे आणि सामान्य नागरिकांना त्रास देणे थांबवले पाहिजे. खासदार श्री गोपाळ शेट्टी यांच्या घराजवळ काँग्रेसच्या मोर्चाच्या दिवशी मी काही मुद्दे पोलिसांसमोर मांडले आणि हा वादाचा व्हिडिओ आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ काही पार्टी आणि नमाज यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे पसरवणाऱ्या आणि अराजकता निर्माण करणाऱ्या या सर्व लोकांचा मी निषेध करतो!”

हा व्हिडिओ भाजप मुंबईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही अशाच कॅप्शनसह शेअर करण्यात आला होता आणि सागर यांनी तो रिट्विट केला होता.

आम्ही Google वर ‘BJP MLA Sagar Yogesh Police Congress’ साठी कीवर्ड शोध घेतला आणि 18 फेब्रुवारी 2022 रोजीचा in24News चा व्हिडिओ रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये ‘भाजप आमदार योगेश सागर पोलीस बॅरिकेड पाहून थक्क झाले’ असे शीर्षक आहे.

रिपोर्टनुसार, कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्राला व काॅंग्रेसला जबाबदार धरत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केले होते यावर काँग्रेस कार्यकर्ते भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कांदिवली येथील निवासस्थानाजवळ निदर्शने करत होते आणि कोणतीही “अप्रिय” घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि वाहतूक वळवली. दरम्यान, भाजप आमदार सागर यांनी घटनास्थळी पोहोचून जनतेची गैरसोय होत असल्याचे कारण देत स्वत: बॅरिकेड हटवण्यास सुरुवात केल्याने भाजप नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.

आम्हाला हाच रिपोर्ट in24News च्या अधिकृत YouTube चॅनेलवर देखील आढळला. व्हायरल व्हिडिओचे मुख्य फ्रेम्स यात पाहिले जाऊ शकतात.

पुढे शोध घेतला असता आम्हाला 16 फेब्रुवारी 2022 रोजीचा TV9 मराठीच्या अधिकृत चॅनेलवर अपलोड केलेला एक YouTube व्हिडिओ सापडला, ज्यात म्हटले आहे की भाजपचे आमदार योगेश सागर यांची पोलिसांची बाचाबाची.

वृत्तानुसार, “काँग्रेसचे बुधवारी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या. भाजप-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडू नयेत म्हणून बॅरिकेड्स लावून रस्ता वळवण्यात आला. मात्र, भाजप आमदार योगेश सागर यांनी घटनास्थळी पोहोचून बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि भाजप नेते यांच्यात बाचाबाची झाली.

Conclusion 

कांदिवलीत “नमाजसाठी रस्ता बंद” केल्याबद्दल भाजप आमदार योगेश सागर यांनी शिवसेनेचा निषेध केल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सागर मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवताना दिसत आहेत.

Result: Misleading Content 

Sources

in24News

Facebook Account Of Yogesh Sagar

YouTube Channels Of in24News & TV9 Marathi


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular