Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत,...

फॅक्ट चेक: आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले नाहीत

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Fact

शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी असे विधान केलेले नाही.

विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. यावेळची निवडणूक अनेक नरेटिव्हसवर गाजते आहे. याच क्रमाने शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा दावा केला जात आहे. आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले. असे हा दावा सांगतो.

आम्हाला X च्या बरोबरीनेच फेसबुकवर हा दावा आढळला.

फॅक्ट चेक: आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले? खोटा आहे हा दावा
Courtesy: X@gadesantosh122

दाव्याचे संग्रहण येथे, येथे, आणि येथे पाहता येईल.

“आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांची आम्ही केव्हाच सुंता केलीय.” असे वाक्य आणि संजय राऊत यांचा फोटो असलेले क्रिएटिव्ह व्हायरल करण्यात येत आहे.

Fact Check/ Verification

सर्वप्रथम आम्ही शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावे व्हायरल होत असलेले विधान त्यांनी केले आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून आम्ही Google वर शोध घेतला. मात्र आम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली नाही. संजय राऊत यांनी असे विधान केले असते तर नक्कीच अधिकृत माध्यमांनी त्याबद्दल वृत्त प्रकाशित केले असते, मात्र तसे आढळले नाही.

फॅक्ट चेक: आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले? खोटा आहे हा दावा
Google Search Result

संजय राऊत यांनी यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकौंट्सवर काही भाष्य केले आहे का? हे आम्ही शोधले. मात्र त्यांच्या X किंवा फेसबुक पेजवर आम्हाला अशा कोणत्याही विधानाची माहिती मिळाली नाही.

यानंतर आम्ही व्हायरल दाव्यातील क्रिएटीव्हची काळजीपूर्वक पाहणी केली. त्यामध्ये आम्हाला ‘ubt माझा’ असा लोगो आढळला. दरम्यान हा प्रकार पाहिल्यानंतर कोणीतरी शिवसेना UBT पक्षातील UBT या अक्षरांचा वापर करून हा खोडसाळपणा केला असल्याचे प्राथमिक तपासात आमच्या निदर्शनास आले. प्रचलित चॅनेलचे ABP माझा असे नाव असताना ubt हे नाव वापरून व्यंगात्मक दावा करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला.

तरीही व्हायरल क्रिएटिव्ह ABP माझा चे असल्याच्या संशयाने अर्थात एबीपीचे क्रिएटिव्ह घेऊन त्यावर एडिटिंग झाले आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला मात्र आम्हाला तशी माहिती मिळाली नाही. अधिक तपासासाठी आम्ही सर्वप्रथम एबीपीने आपल्या अधिकृत वेबसाईटX खाते किंवा फेसबुक पेजवर अशाप्रकारची कोणती पोस्ट केली आहे का? हे शोधले. मात्र संजय राऊत यांचे असे विधान दाखवणारी कोणतीच पोस्ट आम्हाला आढळली नाही.

यामुळे अधिक तपासासाठी आम्ही एबीपी माझा डिजीटलचे संपाद्क सचिन पाटील संपर्क साधला. त्यांनी “अशी बातमी आम्ही छापलेली नसून व्हायरल दावा खोटा असल्याचे” सांगितले.

आम्ही शिवसेनेच्या सोशल मीडिया खात्यांवरही धुंडाळून पाहिले. आम्हाला अधिकृत X किंवा फेसबुक पेजवर असे कोणतेही विधान, त्यासंदर्भातील पोस्टर किंवा व्हिडीओ आढळला नाही.

आम्ही खासदार संजय राऊत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथे आम्हाला असे विधान संजय राऊत यांनी केले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आम्ही थेट संजय राऊत यांच्याशीही संपर्क केला असून त्यांच्या प्रतिक्रियेनंतर हा लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान असे सांगत व्हायरल झालेला दावा खोटा आणि व्यंगात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Satire

Our Sources
Google Search
Social Media Accounts of MP Sanjay Raut
Social Media Accounts of ABP Majha
Conversation with Mr. Sachin Patil, Digital Editor, ABP Majha
Conversation with office of MP Sanjay Raut


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular