Claim–
धक्कादायक, जर हे खरे असेल तर ! CAA चे समर्थन केल्याने भाजप नेते इनायत हुसैन यांना इंदौर मध्ये समर्थकांनी काळे फासले आणि चपलेने मारहाण केली.
Verifcation–
सोशल मीडिया मध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओत एका मुस्लिम व्यक्तीच्या तोंडाला दुसरा एक इसम काळे फासतो आणि नंतर चपलेने मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिए संदर्भात दावा करण्यात येत आहे की- CAA चे समर्थन केल्याने भाजप नेते इनायत हुसैन यांना इंदौर मध्ये त्यांच्याच समर्थकांनी काळे फासले आणि चपलेने मारहाण केली.
हाच दावा असणा-या काही पोस्ट आम्हाला फेसबुक वर देखील आढळून आल्या.
आम्ही या व्हिडिओतील काही स्क्रीनशाॅट्स रिव्हर्स इमेजच्या आधारे शोधले असता न्यूज नेशन नावाच्या हिंदी टिव्ही चैनलच्या फेसबुक पेजवर मागील वर्षीच्या बातमीचा व्हिडिओ मिळाला. यात म्हटले आहे की, राजस्थानच्या अजमेर दर्गामधील खादिमांच्या संस्थानाच्या सचिवांच्या चेह-याला एका व्यक्तीने काळे फासले आणि त्यांनंतर चपलेने मारहाण केली.
याशिवाय युट्यूब वर देखील आणखी एका चॅनलवर हा व्हिडिओ मिळाला.
शोध सुरुच ठेवला असता आम्हाला न्यूज 18 च्या वेबसाईटवर 13 मार्च 2018 रोजी प्रकाशित झालेली बातमी आढळून आली या बातमीत म्हटले आहे की, राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा मध्ये सोमवारी खादिमांची संस्था अंजुमन शैखजादगानचे सचिवांच्या तोंडाला काळे फासण्याचा आणि मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शेख बंटी नावाचा खादिम सचिवांच्या कार्यालयात पोहचला आणि त्याने त्यांच्या तोंडाला काळे फासले नाही तर चप्पलने मारहाण देखील केली. संस्थ्येच्या सदस्यानीं सचिव अब्दुल माजीद चिश्ती यांना बंटी पासून वाचवले. या घटनने खळबळ माजली. चिश्ती यांनी याबद्दल दर्गा ठाण्यात माहिती दिली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की हा व्हिडिओ सीएएचे समर्थन केल्याने भाजपाला नेत्याला समर्थकाने केलेल्या मारहाणीचा नाही तर अजमेर मध्ये खादिमांच्या संस्थेच्या सचिवाला मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ आहे. सोशल मीडियात तो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Reverse Image
Youtube Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)