Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiरेल्वेने महिलांना ज्येष्ठ नागरिक सवलतीसाठी वय मर्यादा 45 केली आहे का? वाचा...

रेल्वेने महिलांना ज्येष्ठ नागरिक सवलतीसाठी वय मर्यादा 45 केली आहे का? वाचा सत्य

Claim

रेल्वे सेवेमध्ये महिलांसाठी Sr. Citizen म्हणुन 45 वय घोषित केले आहे. म्हणजे आता वय वर्ष 45 असलेली स्त्रीला रेल्वे प्रवासासाठी 40% सवलत मिळणार आहे.

Verification
 
सध्या सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल होत असून यात म्हटले आहे कि रेल्वे  सेवेमध्ये महिलांसाठी ज्येष्ठ नागरिक म्हणून 45 वय घोषित केले आहे. म्हणजे आता वय वर्ष 45 असलेली स्त्रीला रेल्वे प्रवासाठी 40 टक्के सवलत मिळणार आहे. यासोबत रेल्वेचे पीडीएफ पाठवत आहे. या पोस्टमध्ये एक पीडीएफ फाईल देखील शेअर केली आहे यात रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणा-या सुविधांची माहिती आहे. 
आम्ही याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले. पोस्टमध्ये शेअर केलेली दोन पानी पीडीएफ फाईल बारकाईने वाचली असता यामध्ये कुठेही ज्येष्ठ महिलासांठी वर्य वर्ष 45 ची किंवा सवलत असल्याचे आढळले नाही.  पडताळणीदरम्यान आम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर ज्येष्ठांसाठी रेल्वे प्रवासात सवलतीची माहितीची पीडीएफ फाईल मिळाली यात म्हटले आहे कि 60 वर्षांवरील पुरुषांना तर 58 वर्षांवरील महिलांना ज्येष्ठ नागरिक सवलतीचा रेल्वे प्रवासात लाभ मिळणार आहे. प्रवासभाड्यात पुरुषांना 40 टक्के तर महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे.
यावरून 45 वर्षांच्या महिलांना रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र यावयावरील महिलांना नेमक्या काय सुविधा मिळतात याबाबत आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला जनसत्ता या हिंदी वेबसाईटवर माहिती मिळाली यात म्हटले आहे कि 45 वर्ष वयावरील महिलांना  आॅनलाईन बुकिंग करताना लोअर बर्थ देण्यात येतील ( त्यांनी लोअर मिडल अप्पर पर्याय निवडला नसला तरी आपोआप त्यांना हा बर्थ दिला जाईल.
यावरुन हेच स्पष्ट होते की रेल्वेमध्यॆ फक्त 58 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या महिलांना रेल्वे प्रवासभाड्यात सवलत मिळणार असून 45 वर्षापुढील महिलांना फक्त लोअर बर्थची सुविधा मिळणार आहे त्यांना प्रवासभाड्यात सवलत मिळणार नाही . सोशल मीडियात चुकीची माहिती पसरवली जात आहे. 
Tools Used 
  • Google Search 
  • Facebook Search 
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा)

Most Popular