Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Marathi
शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केल्याच्या दाव्याने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती दुकानदाराला बांबूने मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
पोस्टमध्ये म्हटले आह की, विलेपार्ले येथे वडापाव फुकट दिले नाही म्हणुन शिवसेना कार्यकर्त्यानी दुकानदाराचा बांबूने सत्कार केला..
हा दावा ट्टिटरवर देखील व्हायरल झाला आहे.
नुकतेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत वडापावचे बिल न दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांनी दिवा ते ठाणे लोकल प्रवास केला. यानंतर भूक लागल्यानं ठाणे स्टेशन बाहेर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वडापाव, भजी खालले. मात्र, या वडापावचे बील न भरताच निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. यानंतर विरोधकांना आयता मुद्दा मिळायला नको म्हणून कार्यकर्त्यांनी या प्रकरणारवर पडदा टाकण्यासाठी बील भरलं.
आता शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केली असल्याच्या दाव्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सत्यता पडताळणीस सुरुवात केली. यासाठी किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता या संबंधीच्या आम्हाला काही बातम्या आढळून आल्या. गुगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला फेब्रुवारी 2016 रोजीची झी 24 तास ची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, 100 वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून सुनील महाडिक नावाच्या युवा सेनेच्या पदाधिका-याने विलेपार्ल्यातील दुकानदाराला मारहाण केली आहे.
याशिवाय आम्हाला शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केली असल्याची महाराष्ट्र टाईम्सची 29 फेब्रुवारी 2016 रोजीची बातमी आढळून आली.यात म्हटले आहे की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने विलेपार्ले पश्चिमेकडील मैदानात शनिवारी, २७ फेब्रुवारीला क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी महाडिकने फरसाण मार्टमध्ये १०० वडापाव फुकट द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, मार्टच्या मॅनेजरने ते देण्यास नकार दिला. यावरून सुरूवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर चिडलेल्या महाडिकने हातात असलेल्या बांबूने मॅनेजर चेतन पटेल यांना मारहाण केली. मारहाणीचे चित्रण दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून महाडिकला ताब्यात घेण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये IBN लोकमत या वृत्तवाहिनीचा लोगो आहे. मात्र या वृत्तवाहिनीचे नाव चार वर्षापूर्वी बदलून News18 लोकमत असे करण्यात आले आहे. यामुळे व्हायरल व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट झाले.
अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ आताचा नाही तर 2016 मधील आहे. सोशल मीडिया युजर्स तो आताचा समजून शेअर करत आहेत.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Runjay Kumar
June 2, 2025
Prasad S Prabhu
May 21, 2025
Prasad S Prabhu
April 29, 2025