भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन 26 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले पण महाराष्ट्रात भाजपा टिपू सुलतानच्या नावाला विरोध करत आहे. भाजपा ही दुटप्पी भुमिका का घेत आहे असा सवाल चित्ररथाचा फोटो शेअर करत व्हायरल सोशल मीडिया पोस्टमध्ये विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाडमधील क्रिडा संकुलाला वीर टिपू सुलतान नाव दिल्यामुळे भाजपा तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. विरोधानंतरही या क्रिडा संकुलांचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Fact Check/Verification
भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन 26 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले होते का? याचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली. यासाठी काही किवर्ड्सचा आधार घेतला मात्र याविषयी कुठेही बातमी आढळून आली. नाही यानंतर आम्ही गूगल इमेज रिव्हर्सच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला युट्यूबवर एक व्हिडिओ आढळून आला.
हा व्हिडिओ 2014 सालचा आहे, 65 व्या प्रजासत्तक दिनी दिल्लीतील राजपथावर कर्नाटकच्या चित्ररथाचे संचलन करण्यात आले होते. व्हिडिओमध्ये 1 तास 30 मिनिटांनतर व्हायरल फोटोतील चित्ररथाची क्लिप सुरु होते.

जानेवारी 2014 मध्ये कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता होती का याचा शोध घेण्यासाठी काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला आढळून आले की, आम्हाला वन इंडियाचा एक रिपोर्ट आढळून आला ज्याता 13 मे 2013 ते 15 में 2018 पर्यंत काॅंग्रेसची कर्नाटकमध्ये सत्ता होती व सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होते असे म्हटले आहे. याचाच अर्थ टिपू सुलतानचा चित्ररथ भाजपने नाही तर काॅंग्रेसच्या काळात सादर करण्यात आला आहे.

26 जानेवारी 2022 रोजी कर्नाटकचा चित्ररथ कशावर आधारीत होता याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला कर्नाटकच्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथावर समृद्ध लोककला, हस्तकला चे दर्शन करण्यात आल्याचे आढळून आले.

टिपू सुलतान खरंच हिंदू विरोधी होता का याचा शोध घेतला असता आम्हाला एबीपी लाईव्ह चा एक रिपोर्ट आढळून आला. यात देशातील सर्वोच्च इतिहासकार इरफान हबीब यांची प्रतिक्रिया घेण्यात आली आहे. इरफान हबीब यांनी सांगितले की, टिपू सुलतानने मलबारमधील बंड दडपले होते आणि हे बंड दडपण्यासाठी अत्याचारही केले गेले. पण हबीबने टिपू सुलतानचे मंदिर पाडणे आणि हिंदूंचे धर्मांतर करणे हे स्पष्टपणे नाकारले. इतिहासानुसार मलबारमध्ये हिंदू राहत होते आणि त्यांच्यावर अत्याचार झाले होते, परंतु टिपूचा वजीर स्वतः हिंदू होता. हे अत्याचार त्या काळी जसे बंड दडपण्यासाठी केले जात होते. टिपूची यामागे हिंदुविरोधी मानसिकता नव्हती.
Conclusion
आमच्या पडताळणीत आढळले की, भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन करण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे. 2014 साली काॅंग्रेस कर्नाटकात सत्तेत असताना राजपथावर हा चित्ररथ 26 जानेवारी रोजी संचलित करण्यात आला होता.
Result: Fabricated News/False
Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.