उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातपंपाने पाणी पितानाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या फोटोच्या माध्यमातून योगींच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. असं बोललं जातंय की, तहान लागल्यावर मिनरल पाणी पिण्याऐवजी मुख्यमंत्री योगी हातपंपाने पाणी पिण्यासाठी पोहोचले.


या फोटोसोबत लिहिले आहे की,”बिस्लरीची बॉटल मागून पाणी पिणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले असतील पण असा मुख्यमंत्री पाहिला नसेल जो तहान भागवण्यासाठी हातपंपापर्यंत पोहोचला असेल.”
पोस्टमध्ये असं लिहून हा फोटो हजारो लोकांनी फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
Fact Check / Verification
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च करून आम्हांला काही माहिती मिळाली नाही. फक्त एवढी माहिती मिळाली की, हा फोटो २०१७ मध्ये चर्चेत आला होता. पण याचा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला आहे.
त्यावेळी या फोटोसंबंधित अनेक बातम्या झाल्या होत्या. पण त्या बातम्यांमध्ये कुठेच सांगितले नाही की, हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातपंपाने पाणी पितांनाचा फोटो शोधण्यासाठी आम्ही काही कीवर्ड गुगलवर टाकले. पण आम्हांला त्या विषयी कुठलीही माहिती मिळाली नाही.
फेसबुकवर कीवर्ड सर्च केल्यावर आम्हांला हा फोटो २०१६ चा आहे, असे समजले. त्या संदर्भातील काही पोस्ट देखील आम्हाला मिळाल्या. जिथे हा फोटो उपलब्ध होता.

या फोटोला एप्रिल २०१६ मध्ये अनेक युजर्सने शेअर केला होता. त्यासोबत युजरने लिहिले होते की, गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या साधेपणाचे हे एक उदाहरण आहे.
एप्रिल २०१६ मध्ये योगी आदित्यनाथ गोरखपूरचे खासदार होते, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री नाही. योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री २०१७ मध्ये झाले.
२०१६ मधील या फोटोसाठी काही लोकांनी हरगोविंद प्रवाह नावाच्या एका व्यक्तीला त्याचे श्रेय दिले होते. फोटोबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी न्यूजचेकरने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल बंद आहे.
आमचे त्यांच्याशी जर काही बोलणे झाले तर आम्ही हा लेख अपडेट करू.
Conclusion
अशा पद्धतीने यावरून असे समजते की, योगी आदित्यनाथ यांचा हातपंपाने पाणी पिण्याचा फोटो जवळपास सहा वर्षांपूर्वीचा किंवा त्यापेक्षाही जुना आहे.
यात असा दावा केला जात होता की, हा व्हायरल फोटो योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तेव्हाचा आहे. पण हा फोटो मुख्यमंत्री होण्याच्या आधीचा आहे, नंतरचा नाही.
Result : False Context / Missing Context
Our Sources
शैवाल शंकर श्रीवास्तव आणि अन्य फेसबुक पोस्ट
स्वतः केलेले विश्लेषण
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.