AI/Deepfake
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राचा भाजपची टोपी घातलेला व्हायरल फोटो एआय निर्मित आहे
Claim
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राचा भाजपची टोपी घातलेला फोटो.

आम्हाला इतर भाषेतही समान दावा मिळाला असून त्याची लिंक आणि संग्रहण येथे पाहता येईल.
Fact
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर, तिचा भाजपची टोपी आणि स्कार्फ घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोवर आज तकचा लोगो छापलेला आहे. आमच्या तपासादरम्यान, जेव्हा आम्ही आज तकची वेबसाइट किंवा सोशल मीडिया हँडल शोधले तेव्हा आम्हाला ज्योती मल्होत्राच्या व्हायरल फोटोसह असे ग्राफिक सापडले नाही.
आम्ही बारकाईने पाहिले तेव्हा आम्हाला फोटोमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. हा फोटो कृत्रिमरित्या उजळलेला दिसतोय. तसेच, ज्योती मल्होत्राच्या टोपीवर दिसणाऱ्या भाजपच्या निवडणूक चिन्हाच्या डिझाइनमध्येही चुका आहेत. या कारणांमुळे, आम्हाला शंका आली की हा फोटो एआय जनरेटेड असावा.

आता आम्ही विविध एआय डिटेक्शन टूल्स वापरून या फोटोची चाचणी केली. या काळात आम्हाला आढळले की हे चित्र एआय जनरेटेड आहे.
हाईव्ह मॉडरेशन टूलने हा फोटो ९९.९% एआय जनरेटेड म्हणून ओळखला.

WasitAI ने देखील या चित्राचे वर्णन AI जनरेटेड असे केले आहे.

sightengine.com टूलने ही प्रतिमा ९९% AI जनरेटेड असल्याचे वर्णन केले आहे.

आम्ही हरियाणा भाजपचे राज्य सचिव कॅप्टन भूपिंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला. फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि सांगितले की ज्योती मल्होत्राचा भाजपशी कोणताही संबंध नाही.
तपासातून असा निष्कर्ष निघतो की ज्योती मल्होत्राचा भाजपची टोपी घातलेला व्हायरल फोटो एआय निर्मित आहे.
विशेष म्हणजे ज्योती मल्होत्रा यांचा असाच एक आम आदमी पार्टीची टोपी परिधान केलेला फोटो प्रसारित करून त्या आपशी संबंधित असल्याचा दावाही करण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Sources
sightengine.com.
Hive Moderation Website
WasItAI Website
Captain Bhupinder Singh, Leader BJP Haryana
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून येथे वाचता येईल.)