Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
केंद्र सरकारने ६ जून (शुक्रवार) रोजी देशभरात राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे का? बरं, येथे आणि येथे पाहिल्या गेलेल्या या व्हायरल वृत्तांनुसार, काम-जीवन संतुलन आणि सार्वजनिक कल्याणाला पाठिंबा देण्यासाठी घेतलेली अनपेक्षित कथित घोषणा म्हणजे देशभरातील शाळा, महाविद्यालये, बँका आणि बहुतेक कार्यालये दिवसभर बंद राहतील, ज्यामुळे लाखो भारतीयांना मोठा विकेंड मिळेल.
संबंधित बातमीत “ताण व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य आणि सांस्कृतिक उत्सवांबद्दल वाढती जागरूकता असताना, अधिकृत सरकारी अधिसूचनेद्वारे जारी केलेली ही घोषणा आली आहे. ही सुट्टी अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी आणि खाजगी क्षेत्रांमध्ये लागू आहे,” असे सांगण्यात आले आहे. ३ जून २०२५ रोजीच्या एका बातमीत पुढे “राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी” रोजीही चालू राहणाऱ्या अत्यावश्यक वाहतूक सेवा, ऑनलाइन सरकारी सुविधा आणि आपत्कालीन सेवांची यादी देण्यात आली आहे.
न्यूजचेकरने प्रथम “जून ६ पब्लिक हॉलिडे इंडिया” हा कीवर्ड सर्च केला, ज्यामुळे आम्हाला कोणत्याही विश्वासार्ह बातम्या किंवा राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टीच्या अशा अचानक घोषणेबद्दल अधिकृत सरकारी अधिसूचना मिळाली नाही. तथापि, आम्हाला येथे आणि येथे अनेक बातम्या आढळल्या, ज्यामध्ये असे म्हटले होते की तिरुवनंतपुरम आणि कोचीमधील बँका शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी बकरी ईदनिमित्त बंद राहतील, तर शनिवार, ७ जून २०२५ रोजी अहमदाबाद, गंगटोक, इटानगर, कोची आणि तिरुवनंतपुरम वगळता देशभरातील बँका ईद-उल-जुहानिमित्त बंद राहतील. आम्ही आरबीआयच्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये तारखांची पुष्टी केली आणि निवडक शहरे वगळता ७ जून २०२५ ही बकरी ईदसाठी नियुक्त बँक सुट्टी आहे. तसेच, यापैकी कोणत्याही बातमीत काम-जीवन संतुलन आणि सार्वजनिक कल्याणामुळे सरकारी सुट्टी असल्याचे नमूद केलेले नाही.
त्यानंतर आम्ही कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सुट्टीचे कॅलेंडर पाहिले, जिथे आम्हाला आढळले की ६ जून २०२५ रोजी कोणतीही सुट्टी नाही, दरम्यान ७ जून २०२५ ही ईद-उल-जुहा (बकरीद) निमित्त राजपत्रित सुट्टी (सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी) म्हणून चिन्हांकित केली आहे.
न्यूजचेकरच्या लक्षात आले की एका रिपोर्टचे लेखक आशिष राय आहेत, ज्यांचा फोटो ग्लॉसी टेक्सचरमुळे एआय-जनरेटेड असल्यासारखा वाटत होता. आम्ही हा फोटो एक एआय-इमेज डिटेक्शन टूल हायव्ह मॉडरेशन वर चालविला. ज्यामध्ये असे म्हटले गेले की त्यात एआय-जनरेटेड किंवा डीपफेक कंटेंट असण्याची शक्यता ९०.१% आहे.
तसेच, आम्ही लेखनातील सामान्य वाक्ये आणि अस्पष्ट वर्णने पाहिली, सर्व चिन्हे एआय-व्युत्पन्न मजकुराकडे निर्देश करत होती.
न्यूजचेकरने हा लेख (https://haematocon2023.com/government-declares-national-public-holiday) एआय-कंटेंट डिटेक्टर QuillBot वर घातला असता त्यामध्ये १००% मजकूर एआय जनरेटेड असल्याचे समजले. साहित्यिक चोरी शोधण्याचे साधन Copyleaks ने देखील म्हटले आहे की १००% मजकूर एआय-जनरेटेड असू शकतो, ज्यामुळे हे सिद्ध होते की हे वृत्त विश्वासार्ह नाही.
आम्ही हे व्हायरल वृत्त फसवणूक रोखण्यासाठी एक प्रमुख ऑनलाइन साधन असलेल्या Scam Detector वर चालविले जेथे संबंधित वेबसाइटला “संशयास्पद. मध्यम-जोखीम. अलर्ट” म्हणून ध्वजांकित केले गेले, ज्याचा विश्वास स्कोअर ४९.५/१०० इतका कमी आढळला.
“स्कॅम डिटेक्टर वेबसाइट व्हॅलिडेटर haematocon2023.com ला प्लॅटफॉर्मवर कमी ते मध्यम ट्रस्ट स्कोअर देते: 49.5. हे सूचित करते की व्यवसाय खालील टॅग्जद्वारे परिभाषित केला जाऊ शकतो: संशयास्पद. मध्यम-जोखीम. अलर्ट.. “आम्हाला आमच्या स्कोअरबद्दल विश्वास आहे कारण आम्ही इतर हाय-टेक, फसवणूक-प्रतिबंधक कंपन्यांसोबत भागीदारी करतो ज्यांना समान समस्या आढळल्या. तर, हा कमी स्कोअर का? आम्ही haematocon2023.com च्या उद्योगाशी संबंधित 53 एकत्रित घटकांवर आधारित 49.5 स्कोअर पाहिला. अल्गोरिदमने फिशिंग, स्पॅमिंग आणि शंकास्पद. मध्यम-जोखीम. अलर्ट. टॅग्जमध्ये नमूद केलेल्या इतर घटकांशी संबंधित संभाव्य उच्च-जोखीम आढळते,” असे अहवालात आढळते.
न्यूजचेकरने हे वृत्त (https://aerocoe.org.in/govt-declares-public-holiday-2025/) एआय-कंटेंट डिटेक्टर QuillBot वर चालविले असता असे आढळले की ९३% मजकूर एआय निर्मित आहे. साहित्यिक चोरी शोधण्याचे साधन Copyleaksने म्हटले आहे की ९७.६% मजकूर एआय-जनरेटेड असू शकतो, ज्यामुळे हे वृत्तही विश्वासार्ह नसल्याचे सिद्ध झाले.
आम्ही हे वृत्त फसवणूक रोखण्यासाठी एक प्रमुख ऑनलाइन साधन असलेल्या Scam Detector वर चालविले असता, तेथे वेबसाइटला “संशयास्पद. नवखी. अविश्वासू” असे ध्वजांकित केले, ज्याचा विश्वास स्कोअर 5/100 इतका कमी आहे.
“स्कॅम डिटेक्टर वेबसाइट व्हॅलिडेटरने aerocoe.org.in ला प्लॅटफॉर्मवरील सर्वात कमी विश्वास स्कोअर 5 दिला . हे सूचित करते की व्यवसाय खालील टॅग्जद्वारे परिभाषित केला जाऊ शकतो: संशयास्पद. नवीन. अविश्वसनीय.. “आम्हाला आमच्या स्कोअरबद्दल विश्वास आहे कारण आम्ही इतर हाय-टेक, फसवणूक-प्रतिबंधक कंपन्यांसोबत भागीदारी करतो ज्यांना समान समस्या आढळल्या. तर, हा कमी स्कोअर का? आम्ही aerocoe.org.in च्या उद्योगाशी संबंधित 53 एकत्रित घटकांवर आधारित चाचणीत 5 स्कोअरवर आलो. अल्गोरिदमने फिशिंग, स्पॅमिंग आणि संशयास्पद. नवीन. अविश्वसनीय. टॅग्जमध्ये नोंदवलेल्या इतर घटकांशी संबंधित उच्च-जोखीम असल्याचे आढळले.” असे अहवालात म्हटलेले आहे.
न्यूजचेकरने या आधी एका बनावट बातमीचे खंडन केले होते, ज्यामध्ये केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना ट्रेन, बस, मेट्रो सेवा आणि अगदी देशांतर्गत विमान प्रवासात मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे, असे सांगण्यात आले होते.
त्याचप्रमाणे, सरकारी योजना आणि प्रकल्पांबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यासाठी सरकारी संस्था किंवा शैक्षणिक संस्थांच्या बनावट वेबसाइट देखील तयार केल्या गेल्या होत्या, ज्यामुळे वाचक गोंधळात पडले होते. असेच एक उदाहरण येथे पाहता येईल, जिथे शैक्षणिक संस्थेची असल्याचे भासवणाऱ्या एका वेबसाइटने खोटा दावा केला होता की सरकार भाडेकरूंसाठी “ऑक्युपन्सी टॅक्स” लागू करण्याची योजना आखत आहे. त्याच वेबसाइटच्या दुसऱ्या अहवालात दावा करण्यात आला होता की लवकरच UPI व्यवहारांवर GST लागू केला जाईल, तर दुसऱ्या अहवालात असे म्हटले आहे की नवीन 4 दिवसांचा कामाचा आठवडा विचारात घेतला जात आहे.
आम्ही सायबरसुरक्षा संशोधक करण सैनी यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी सांगितले की या बनावट वेबसाइट्स प्रामुख्याने जाहिरातींमधून महसूल मिळवण्याचा हेतू ठेवतात. पुढे म्हणाले की, “साइट्स दिसण्यावरून AdSense वापरत आहेत. साधारणपणे, Google AdSense मध्ये त्यांच्या प्रोग्राममध्ये कोणत्या साइट्स स्वीकारल्या जातात याचे नियम असतात, जिथे कमी दर्जाच्या किंवा चुकीच्या कंटेंट असलेल्या साइट्स स्वीकारल्या जात नाहीत. एलएलएम उच्च दर्जाचे दिसणारे मजकूर लिहू शकल्याने हे उलटे झाले आहे.”
“जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद किंवा दिशाभूल करणारी बातमी आढळली तर ती खरी म्हणून स्वीकारण्यापूर्वी ती अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा विश्वसनीय स्त्रोतांकडून पडताळून पहा. सामान्य पद्धतीनुसार, तुम्हाला आधीच माहित असलेल्या विश्वसनीय स्त्रोतांकडून आलेली सामग्री वापरणे चांगले,” असे सैनी यांनी न्यूजचेकरला सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, आरोप असणाऱ्या लेखकांना पडताळणे हे आणखी एक उपयुक्त पाऊल आहे.
सरकारने ६ जून रोजी राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असे सांगणाऱ्या बनावट एआय-निर्मित बातम्या व्हायरल झाल्या आहेत आणि खऱ्या बातम्या म्हणून शेअर केल्या जात आहेत.
Source
Hive Moderation tool
Quillbot tool
Copyleaks tool
Scam Detector tool
Conversation with Karan Saini, a cybersecurity researcher
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी कुशल मधुसूदन यांनी केले असून येथे वाचता येईल.)
Prasad S Prabhu
June 24, 2025
Kushel Madhusoodan
June 20, 2025
Kushel Madhusoodan
June 14, 2025