Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
गुजरातमध्ये देशी दारू पिलेल्या माणसाकडे सिंहाने दुर्लक्ष केले.
हा दावा खोटा आहे. हा व्हिडीओ एआय निर्मित आहे.
रस्त्यात झोपलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणाऱ्या सिंहाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. असंख्य फेसबुक युजर्सनी हा दावा केल्याचे निदर्शनास आले.

“गुजरातच्या काठियावाड येथे रात्री देशी पौवा पिवून एक माणूस झोपला होता,,,तितक्यात….तात्पर्य:- साक्षात वनराज सुद्धा बेवड्याच्या नादी लागत नाही.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात असून व्हाट्सअपवरही शेयर केला जात आहे.
व्हिडिओ फुटेजमध्ये, रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर झोपलेल्या माणसाजवळ एक सिंह फिरताना दिसत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये, सिंह येतो आणि नंतर झोपलेल्या माणसाजवळ जातो. तो माणूस झोपलेला असल्याने सिंह आल्याचे त्याला कळत नाही. पुढे तो सिंह त्या व्यक्तीवर हल्ला न करता दुर्लक्ष करून निघून जातो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुजरातमध्ये, गिर, जुनागड आणि अमरेलीसह इतर भागात रस्त्यावर सिंह येत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सिंह मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ला केल्याचेही दिसते. विशेषतः लहान मुलांना, प्राण्यांना आणि रात्री झोपलेल्या लोकांनाही ओढत नेण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्शवभूमीवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ देशी दारू पिणाऱ्याकडे सिंहाने दुर्लक्ष केल्याचे सांगत पसरविला जात आहे.
प्रारंभी आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. मात्र गुजरातमध्ये अशी घटना घडल्याची माहिती देणारी बातमी कोणत्याच अधिकृत माध्यमात प्रसिद्ध झालेली नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.
सीसीटीव्ही फुटेजचा भास करणाऱ्या व्हायरल व्हिडिओच्या अधिकृततेवर आम्हाला संशय आला. न्यूजचेकरच्या लक्षात आले की बंद दुकानांच्या फलकांवर लिहिलेला मजकूर, जो हिंदीसारखा दिसत होता, तो निरर्थक होता, तर गुगल ट्रान्सलेट टूलला भाषा ओळखता आली नाही, त्यामुळे ती एआय-जनरेटेड असू शकते असे सूचित होते. तसेच, व्हायरल व्हिडिओमधून तुम्हाला दिसणारे आणि ऐकू येणारे स्थिर आवाज आणि पांढऱ्या रेषा सूचित करतात की तो टेप-आधारित होता, जो आधुनिक डिजिटल सीसीटीव्ही प्रणालींसारखा अजिबात नाही, ज्यामुळे व्हिडिओवर लागू केलेला हा फिल्टर इफेक्ट असण्याच्या शंका निर्माण होतात. यासाठी आम्ही हा व्हिडीओ AI डिटेक्शन टूल्सवर चालवून पाहण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आम्ही व्हिडिओचा स्क्रीनग्रॅब एआय-इमेज डिटेक्टर WasitAI वर चालवला, ज्याने म्हटले की त्यांना खात्री आहे की ही प्रतिमा किंवा त्याचा एक महत्त्वाचा भाग एआयने तयार केला आहे.

Undetectable AI या दुसऱ्या टूलने ती प्रतिमा एआयने तयार केली असल्याचे म्हटले.

Decopy AI डिटेक्शन टूलने म्हटले की ते एआय-जनरेटेड असण्याची शक्यता अधिक आहे.

त्यानंतर न्यूजचेकरने कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यामुळे आम्हाला ६ जून २०२५ रोजी युट्यूबवर अपलोड केलेला तोच व्हिडिओ मिळाला, ज्याचे शीर्षक पोर्तुगीज भाषेत होते, “Lion founds man sleeping on the street in Gujarat”. वर्णनात स्पष्टपणे म्हटले होते की व्हिडिओ एकतर डिजिटली अल्टर केलेला आहे किंवा डिजिटल पद्धतीने तयार केला आहे.

“The World Of Beasts” नावाच्या ब्राझील-चॅनेलचे डिस्क्रिप्शन सांगते की “AI-सहाय्यित डिझाइन्स”. या चॅनेलमध्ये प्राण्यांचे अनेक डिजिटल पद्धतीने तयार केलेले व्हिडिओ आहेत, जे सिद्ध करते की व्हायरल व्हिडिओ AI-निर्मित आहे.
व्हायरल व्हिडीओ गुजराती आणि इंग्रजी भाषांतील कॅप्शनसह शेयर केला जात असून न्यूजचेकर इंग्रजी आणि गुजरातीनेही यावर फॅक्टचेक प्रसिद्ध केले आहेत.
अशाप्रकारे सिंहाने रस्त्यात झोपलेल्या माणसावर हल्ला न करता दुर्लक्ष केल्याचे सांगत व्हायरल झालेला व्हिडीओ वास्तविक घटना नसल्याचे आणि हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे स्पष्ट होते.
Source
WasitAI tool
Undetectable AI tool
Decopy AI tool
Youtube video, The World Of Beasts, June 6, 2025
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025