Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
चंदगड तालुक्यातील शिनोळी गावातील संजय पाटील यांच्या शेतात जुळी रताळी सापडली.
हा दावा AI जनरेटेड फोटोच्या माध्यमातून केला जात असून दिशाभूल करणारा आहे.
चंदगड तालुक्यातील शिनोळी गावातील संजय पाटील यांच्या शेतात अशी जुळी रताळी सापडली आहेत, असे सांगणारा एक फोटो सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
‘निसर्गाची किमया’ असे सांगत व्हायरल दाव्याच्या कॅप्शनसह हा फोटो फेसबुकच्या बरोबरीनेच व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात फिरत आहे.
न्यूजचेकरने या दाव्याचा तपास केला आणि आम्हाला हा फोटो AI जनरेटेड असल्याचे दिसून आले.
अन्नधान्याच्या बाबतीत अशी किमया अनेकदा दिसून येते. दरम्यान आम्ही असे खरेच झाले आहे का? हे पाहण्यासाठी Google वर कीवर्ड सर्च करून पाहिला. मात्र अशाप्रकारे चंदगड तालुक्यातील शिनोळीच्या शेतात जुळी रताळी आढळल्यासंदर्भात कोणत्याही अधिकृत माध्यमाने बातमी प्रसिद्ध केल्याचे आम्हाला जाणवले नाही.
पुढील तपासात न्यूजचेकरने संबंधित व्हायरल फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. मात्र अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भाषांमधील फोटोसह पोस्ट आम्हाला आढळल्या. मात्र फोटोचा मुख्य स्रोत उघड झाला नाही.
दरम्यान आम्ही संबंधित व्हायरल फोटोचे बारकाईने निरीक्षण केले. जुळी रताळी, त्यांना असलेले चेहरे आणि फोटोत पाठीमागे थांबलेले अस्पष्ट चेहऱ्याचे लोक यावरून आम्हाला हा फोटो AI जनरेटेड असल्याचा संशय आला.

दरम्यान आम्ही संबंधित फोटो WasItAI, Hive Moderation, Sightengine आणि AI or Not सारख्या AI डिटेक्शन टूल्सवर चालविला.
WasItAI ने संबंधित फोटो किंवा त्यातील काही भाग AI जनरेटेड असल्याचे सांगितले.

Hive Moderation ने संबंधित फोटो AI जनरेटेड असल्याची शक्यता ९४.४ टक्के आहे. अशी माहिती दिली.

Sightengine ने संबंधित फोटो AI जनरेटेड असल्याची शक्यता ९९ टक्के आहे. अशी माहिती दिली.

AI or Not ने ही संबंधित फोटो AI जनरेटेड असल्याची पुष्टी केली.

अधिक तपासासाठी आम्ही दैनिक पुढारीचे स्थानिक पत्रकार शिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. “त्यांनी अशाप्रकारे जुळी रताळी आढळलेली नसून व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे” आम्हाला दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात सांगितले.
अशाप्रकारे आमच्या तपासात चंदगड तालुक्यातील शिनोळी गावातील संजय पाटील यांच्या शेतात जुळी रताळी सापडली, हा दावा AI जनरेटेड फोटोच्या माध्यमातून केला जात असून तो दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Google Search
Self Analysis
WasItAI
Hive Moderation
Sightengine
AI or Not
Telephonic conversation with Journalist Shivaji Shinde, Daily Pudhari
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025