Authors
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार, असा दावा करण्यात आला. माझ्या मुस्लिम बांधवांसाठी दुःखाचा दिवस असे उद्धव ठाकरे म्हणत असल्याचे सांगणारे सकाळचे न्यूजकार्ड, असा दावा करण्यात आला. बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवरील हल्याचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केल्यावर अभिनेत्री ऐश्वर्या रायने लंडनस्थित उद्योगपती वाचे मानुकियानसोबत फोटो शेयर केले आहेत, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये एक मुस्लिम व्यक्ती भारतीय तिरंगा पायदळी तुडवत आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार?
टाटा मोटर्स नवीन नॅनो कार लाँच करणार, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
बाबर देशासाठी शहीद झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले?
बाबर देशासाठी शहीद झाला असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचा दावा सकाळ चा लोगो वापरून न्यूजकार्डच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
हा व्हिडीओ बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेचा नाही
बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवर हल्ला झाल्याचा व्हिडीओ असा दावा करण्यात आला, आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
ऐश्वर्या राय आणि लंडन-स्थित उद्योगपतीच्या व्हायरल इमेजीस एडिटेड
घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केल्यावर अभिनेत्री ऐश्वर्या रायने लंडनस्थित उद्योगपती वाचे मानुकियानसोबत फोटो शेयर केले आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
बांगलादेशात एका मुस्लिम व्यक्तीने भारतीय तिरंगा पायदळी तुडवला?
बांगलादेशात एका मुस्लिम व्यक्तीने भारतीय तिरंगा पायदळी तुडवला असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा