Fact Check
Weekly Wrap: नरेंद्र मोदींचा राजकीय संन्यास ते करदात्यांना विशेष बक्षीस पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक

एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांमुळे चर्चेत राहिला. नरेंद्र मोदींचा राजकीय संन्यास ते करदात्यांना विशेष बक्षीस पर्यंत अनेक दावे करण्यात आले. मोहम्मद रफी यांच्या काश्मीरवरील गाण्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारने बंदी घातली होती, असा दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे आणि त्यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा दिवस १६ सप्टेंबर २०२५ असेल, असा दावा करण्यात आला. १ एप्रिल २०२५ पासून लागू होणाऱ्या पीएम करदाता कल्याण योजनेअंतर्गत करदात्यांसाठी विशेष बक्षिस मिळेल, असा दावा करण्यात आला. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर मराठी विरोधी आंदोलन झाले, असा दावा करण्यात आला. प्रकाश आंबेडकरांनी वक्फच्या निर्णयाला पूर्ण समर्थन देत संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलंय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

मोहम्मद रफी यांच्या या गाण्यावर काँग्रेस सरकारने बंदी घातली होती?
मोहम्मद रफी यांच्या काश्मीरवरील गाण्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारने बंदी घातली होती, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

नरेंद्र मोदी १६ सप्टेंबर रोजी राजकारणातून निवृत्त होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे आणि त्यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा दिवस १६ सप्टेंबर २०२५ असेल, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

‘पीएम करदाता कल्याण योजने’ अंतर्गत करदात्यांना मिळणार बक्षीस?
१ एप्रिल २०२५ पासून लागू होणाऱ्या पीएम करदाता कल्याण योजनेअंतर्गत करदात्यांसाठी विशेष बक्षिस मिळेल, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा विडंबनात्मक असल्याचे निदर्शनास आले.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर झाले मराठी विरोधी आंदोलन?
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर मराठी विरोधी आंदोलन झाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.

प्रकाश आंबेडकरांनी वक्फच्या निर्णयाला पूर्ण समर्थन देत संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलंय?
प्रकाश आंबेडकरांनी वक्फच्या निर्णयाला पूर्ण समर्थन देत संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलंय, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.