मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एबीपी माझाच्या बातमीची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री ख्रिश्चन समाजास कोरोनासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. सोशल मीडियात दावा करण्यात आला आहे की मुख्यमंत्र्यांनी ख्रिश्चन समाजालाच कोरोनासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

पडताळणी-आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. फेसबुकवर हा व्हिडिओ याच दाव्याने पोस्ट केल्याचे आढळून आले. या 21 सेकंदांच्या क्लिपमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणताहेत की, ख्रिश्चनांनी म्हणा आपल्या जिजसकडे की, लवकरात लवकर प्रार्थना करा की हे जग ग्रासून ज्याने टाकले आहे त्या संकटाला नष्ट करुन आम्हाला सुखाची आनंदाची आणि निरोगी आरोग्याचे दिवस,आयुष्य पुन्हा एकदा जगायला मिळो ही प्रार्थना करा. जय हिंद जय महाराष्ट्र.
याशिवाय आम्हाला यूट्यूबवर देखील ही व्हिडिओ क्लिप आढळून आली.
इस्टांग्रामवर देखील ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
फक्त 21 सेंकदाची क्लिप असल्याने शंका निर्माण झाली. बातमीचा पूर्ण व्हिडिओ आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या शोधादरम्यान आम्हाला एबीपी माझाच्या बातमीचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर आढळून आला. यात ते व्हिडिओच्या सुरु झाल्यानंतर शेवटी 4 मिनिट 50 व्या सेंकदाला मुख्यमंत्री म्हणतात- आपण सर्वर्धमियांनी आजपर्यंत जे मला सहकार्य केले सरकारला जे सहकार्य केलेले आहे. आपले सगळे सणवार उत्सव हे घरातनं साजरे करा आणि प्रत्येकाने आपापल्या ईश्वराकडे अगदी मुसलमानाने आपल्या अल्लाकडे ख्रिश्चनाने म्हणा आपल्या जिससकडे सगळ्यांनी प्रार्थना करा की, लवकरात लवकर हे जग ग्रासून ज्याने टाकले आहे त्या संकटाला नष्ट करुन आम्हाला सुखाची आनंदाची आणि निरोगी आरोग्याचे दिवस,आयुष्य पुन्हा एकदा जगायला मिळो ही प्रार्थना करा. जय हिंद जय महाराष्ट्र.
यावरुन हेच स्पष्ट होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त ख्रिश्चन धर्मियांनाच कोरोनासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केलेले नाही तर प्रत्येक धर्माच्या लोकांना असे आवाहन केले आहे. त्यांच्या एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करून भ्रामक दावा करण्यात आला आहे.
Source Facebook, YoutubeI, nstagram
Result- Misleading/partly False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)