Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
कोविड-19 हा आजार नाही हे जगभरातील डॉक्टरांनी मान्य केले आहे, असा दावा करत एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
हा दावा 2020 च्या सुरुवातीला देखील व्हायरल झाला होता, जेव्हा Newschecker ला दावा दिशाभूल करणारा आढळला होता. आम्ही व्हिडिओ क्लिप काळजीपूर्वक पाहू लागलो. व्हिडिओ क्लिपमध्ये प्रवक्त्याचे नाव ‘एल्के डी क्लर्क’ असे आहे. गुगलवर हे नाव शोधल्यावर Worlddoctoralliance नावाची वेबसाइट सापडली. वेबसाइटनुसार, व्हिडिओ क्लिपमध्ये महिला प्रवक्त्यासह दिसणारे लोक जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सदस्य नाहीत. हा Worlddoctoralliance नावाचा जगभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक गट आहे, जो कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपवण्याच्या मागणीसाठी एकत्र आला होता.
तपासादरम्यान, आम्हाला 23 ऑक्टोबर 2020 रोजी Associated press च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला एक लेख आढळला, जिथे व्हायरल व्हिडिओ क्लिप मध्ये असलेला दावा नाकारण्यात आला आहे. याशिवाय ‘द गार्डियन’ने वर्षभरापूर्वी प्रकाशित केलेल्या आपल्या रिपोर्ट मध्ये हे देखील सांगितले होते की ही संस्था कोविड-19 संदर्भात दिशाभूल करणारे दावे कसे पसरवत आहे.
महत्वाचे म्हणजे , भारत सरकारने कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारने लोकांना मास्क घालण्याचा आणि संरक्षणासाठी सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला दिला आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर कोरोनाबाबत खोटे दावे शेअर केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
World doctor Alliance Website
AP Fact Check
Report Published by The Guardian
तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि तुम्हाला अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर येथे क्लिक करा.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
May 28, 2025
Vasudha Beri
August 28, 2024
Newschecker Team
May 22, 2020