Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
दावा- मास्कचा अधिक काळ वापर केल्यास परिणामी व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
सोशल मीडियात मुंबईतील कस्तुरबा हाॅस्पिटलमधील डाॅ.जयवंत लेले यांच्या नावाने एक मॅसेज व्हायरल होत आहेत यात म्हटले आहे की, मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे जर ते आपण अधिक काळ वापरल्यास रक्ताचे आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो व मेंदूला कमी आॅक्सिजन मिळतो त्यामुळे मृत्यू ओढावण्याची शक्यता असते.

पडताळणी- आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली असता याच दाव्याच्या अनेक फेसबुक पोस्ट आढळून आल्या.

व्हायरल मॅसेजध्ये डाॅ. जयवंत लेले कस्तुरबा हाॅस्पिटल मुंबई असे लेखकाचे नाव असल्याने आम्ही या संदर्भात हाॅस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र अशा नावाचे डाॅक्टर तेथे नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले.
मॅसेजमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठीआम्ही या संदर्भात पुण्यातील डाॅ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,व्हायरल मॅसेजमधील दावा हा पूर्णपणे खोटा आहे. मास्क जास्त वेळ वापरल्याने व्यक्तीचा मृ्त्यू होत नाही. समोरील व्यक्तीचे शिंकेचे किंवा खोकल्याचे तुषार नाकावाटे किंवा तोडांवाटे आपल्या शरीरात जाऊ नये यासाठी मास्क असतो. डाॅक्टरांना आॅपरेशनच्या वेळी 8 किंवा 9 तास किंवात्यापेक्षा जास्त वेळ मास्क वापरावे लागतात. आजपर्यंत एकही डाॅक्टर किंवा व्यक्ती मास्क जास्त वेळ घातल्याने बेशुद्ध पडल्याची किंवा मृत पावल्याची घटना घडलेली नाही. तसेच पोलिस सुद्धा जास्त काळ मास्क वापरतात बसतात मात्र त्यांनाही हा त्रास कधी जाणवल्याच्या घटना समोर आलेल्या नाहीत. डाॅक्टरांसाठी एन 95 मास्क असतात तर सर्वसामान्यांनी कापडी मास्क किंवा स्कार्फ, पंचा आदी वापरले तरी चालते. एसीमध्येही मास्क वापरला तरी काही होत नाही.घरी मास्क वापरण्याच्या मुद्द्याबाबात डाॅ.भोंडवे यांनी सांगितले की घरात जर एखाद्या सदस्याला सतत खोकला किंवा शिंका येत असतील तर त्याने मास्क वापरला पाहिजे तसेच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत बाहेरील कुणी व्यक्ती घरात आला असेल त्याने मास्क घातलेला असणे आवश्यक आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, मास्कचा जास्त काळ वापर केल्याने मृत्यू होऊ शकतो हा दावा असत्य आहे. यात कोणतेही तथ्य नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल होत आहे
Source-
Whatsapp, Facebook, Google
Result- Fabricated News/Incorrect content
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Kushel Madhusoodan
June 3, 2025
Prasad S Prabhu
May 28, 2025
Newschecker Team
March 25, 2020