कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करण्यासाठी आमिर खान आणि शाहरुख खान या दोघांनी मिळून 1000 कोटी तर सलमान खान ने 250 कोटींचा धनादेश सरकारला दिला आहे.
दाव्याचे संक्षिप्त विवरण–
सध्या सोशल मीडियामध्ये कोरोना व्हायरसच्या संदर्भात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी अनेक संस्था व्यक्ती सरकारला मदत करत आहेत. अशातच प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेते आमिरखान, शाहरुख खान यांनी 1000 कोटींची तर सलमान खान ने 250 कोटींची मदत केल्याच्या पोस्ट टिकटाॅक आणि शेअरचॅट तसेच इतर समाजमाध्यमांत व्हायरल होत आहेत.
Verification–
सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या पोस्टची आम्ही पडताळणी करण्याचे ठरविले असता सर्वात आधी आम्ही आमिर खान आणि शाहरुख खान यांनी खरंच काही मदत केली आहे का याचा शोध घेतला. असता आम्हाला टिकटाॅकवर एक पोस्ट आढळून आली.
याशिवाय शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर सलमान खान ने 250 कोटींचा धनादेश दिल्चाची पोस्ट देखील आढळून आली. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सलमान खानचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
आम्ही या दोन्ही व्हायरल पोस्टची पडताळणी सुरु ठेवली. याबाबत गूगलमध्ये शोध घेतला असता या तिन्ही बाॅलिवुड सेलिब्रिटींच्या कोरोना विषयीच्या बातम्या आढळून आल्या.
लाईव्ह हिंदुस्तान या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत शाहरुख खान नेे कोरोना पासून बचाव कसा करावा याच्या टिप्स आपल्या फॅन्सना व्हिडिओच्या माध्यातून दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली मात्र आम्हाला कुठेही शाहरुख खानने करोडो रुपयांची मदत केल्याची बातमी आढळून आली नाही.
याशिवाय आम्हाला आमिर खान आणि सलमान खान यांच्याविषयीची बातमी
अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर देखील आढळून आली. कोरोना व्हायरसमुळे या दोघांनी कार्यक्रम रद्द केल्याची माहिती यात देण्यात आली आहे. मात्र या दोघांनी निधी दिल्याचा उल्लेख नाही.
याबाबत आम्ही
शाहरुख खान,
आमिर खान आणि
सलमान खान यांचे ट्विटर अकाउंट देखील तपासले. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करोडो रुपयांची मदत केल्याचा उल्लेख तिघांच्याही हॅंडलवर नाही. यानंतर आम्ही
पंतप्रधान सहाय्यता निधीची वेबसाईट तपासली पण तिथेही याचा उल्लेख नाही. याशिवाय आम्हाला
एनडीटिव्हीची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की शाहरुख सलमान यांनी काही मदत केली नाही मात्र दक्षिणेतील सुपरस्टार मदत करत आहेत.
यानंतर आम्ही शाहरुख आणि आमिर खान यांचा व्हिडिओ कधीचा आहे तपासून पाहिले असता दोघे मागील वर्षी 150 Years of Gandhi या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते त्यावेळीचा असल्याचा आढळून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सलमान खान यांचा व्हिडिओ देखील पाच वर्षापूर्वीचा असल्याचे आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की शाहरुख, आमिर आणि सलमान खान यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करोडों रुपयांची मदत सरकारला केलेली नाही. सोशल मीडियामध्ये भ्रामक दावा केला जात आहे.
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)