Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स असे सांगणारा दावा झाला. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे, असा दावा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत आहे, असा दावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
हा इराणचा इस्रायलवरील हल्ल्याचा व्हिडीओ नाही
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स असे सांगणारा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली?
दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
‘जुमला’ विरोधात आमिर खानचा इशारा?
काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राम नवमीला मटण खाल्ले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा