Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
सांगली जिल्ह्यातील विट्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याचा मॅसेज व्हाट्सएॅपवर व्हायरल झाला आहे. एक मिनिट 36 सेकंदाच्या या व्हिडिओत एका हातपाय बांधलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर करण्यात आला असून यात म्हटले आहे की, “प्रिय ग्रामस्थांनो सावधान फासेपारधींच्या काही घटना एेकण्यात येत आहेत.
विट्यामध्ये दोन फासेपारध्यांना अटक केली असून, त्यांनी कबूल केले आहे की, ते एक दोन तीन नसूनच तीन हजार आहेत. मध्यप्रदेश आणि गडचिरोली या भागातून ते आले आहेत. तीन चार वर्षांच्या मुलांना ते पळवून नेतात. आपल्या गावात शंकास्पद व्यक्ती वाटल्यास त्वरीत जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधा. फासेपारधी तीन हजार आहेत, फासेपारध्यांनी तालुक्यातील सगळ्या गावात धुमाकूळ घातला आहे. गाफिल राहू नका. तरी सर्वांना एक नम्र विनंती आहे की, आता काही दिवसांत आपल्या आजुबाजूच्या गावात चो-यांचे, लुटमारीचे वाढते प्रमाण ध्यानात घेता आपल्या सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. वेळप्रसंगी गावांमध्ये रात्री गस्त घालायचे नियोजन तरुणांनी केले पाहिजे. आपले मोबाईल तसेच चार्जिंग तसेच त्यामध्ये पुरेसा बॅलन्स कारण आपण एकमेकांना संपर्क करु शकू. आपल्या गावातील सर्व बॅटरीज चार्ज करुन ठेवल्या पाहिजेत, चोरांची आयडिया अशी आहे की, ते गावातील सर्व लाईट, डिपी बंद करतात आणि अंधाराचा फायदा घेतात. तरी आपल्या गावाच्या भल्यासाठी हा विषय मस्करी वारी घेऊ नका. हा मॅसेज आपल्या मित्रांना कसल्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता पोहचला पाहिजे. विषय फार गंभीर आहे हसण्यावारी नेऊ नका. सर्वांना कळकळीची विनंती आहे, रात्री गस्त घालताना आपल्या हातात काठी किंवा धारधार शस्त्र, बॅटरीज आपला मोबाईल आपल्या बरोबर असावा, कृपया हा विषय सिरियसली घ्या, प्लीज हा मॅसेज आपल्या गावातील सर्व मित्रांपर्यंत पोहचला पाहिजे. प्लीज मित्रांनो एकमेकांना सहकार्य करा”.
लहान मुलांना पळविणारी टोळी खरंच सांगलीतील विटा आणि परिसरात दाखल झाली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र आम्हाला मुळे पळविणा-ा टोळीतील दोन सदस्यांना पकडल्याची बातमी कुठेही आढळून आली नाही. नाही यानंतर आम्ही व्हायरल फोटो बद्दल अधिक माहिती मिळविण्याकरिता शोध सुरु ठेवला असता आम्हाला आपली बातमी या वेबपोर्टलवर विट्यात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा असल्यची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, व्हॉट्स ॲपवर सध्या तीन ते चार वर्षे वयाची लहान मुले पळवणारी फासे पारध्यांची एक टोळी फिरत असून, विटा पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आहे. असा मेसेज व एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याशिवाय आम्हाला Seven Star News या युट्यूब चॅनलवरील बातमीचा व्हिडिओ आढळून आला ज्यात विट्यात मुले पळविणा-या टोळीची अफवा असल्याचे म्हटले आहे. शिवाय यात विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र शेळके यांनी लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्याचे आढळून आले.
फासे पारधींच्या मुळे पळविणा-ा टोळीच्या अफवामुळे महाराष्ट्रात मागील चार-पाच वर्षांत काही निष्पाप लोकांना आपला गमावावा लागलेला आहे. पाच वर्षांपूर्वी साक्री तालुक्यात पाच जणांचा जीव जमावान घेतला होता तर दोन वर्षापूर्वी आरोगाबाद जिल्ह्यात दोघांचा जमावाच्या मारहाणीत बळी गेला होता.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सांगली जिल्ह्यातील विट्यात लहान मुले पळविणारी टोळी आलेली नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
Youtube- https://www.youtube.com/watch?v=Qq_T_s7Uop4
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Prasad S Prabhu
May 17, 2025
Prasad S Prabhu
May 15, 2025
Prasad S Prabhu
February 24, 2024