Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर असंख्य फेक दावे व्हायरल झाले. शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारूचे वाटप होत आहे, असा दावा करण्यात आला. चित्रात दिसणारी महिला AIMIM नेते वारिस पठाण यांची पत्नी, सख्खी बहीण आणि सावत्र आई आहे, असा दावा करण्यात आला. इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे, असा दावा करण्यात आला. एका छायाचित्राच्या माध्यमातून मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर असे घाव करीत आहे, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
शेतकरी आंदोलनात वाटली दारू?
शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारूचे वाटप होत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
AIMIM नेते वारिस पठाण आणि चित्रात दिसणारी महिला यांच्यात नातेसंबंध नाहीत
चित्रात दिसणारी महिला AIMIM नेते वारिस पठाण यांची पत्नी, सख्खी बहीण आणि सावत्र आई आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे?
इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
हा फोटो शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही
एका छायाचित्राच्या माध्यमातून मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर असे घाव करीत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
पाकिस्तानच्या ध्वजाबद्दल अमित शहा यांनी हा निर्णय घेतलेला नाही
पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा