Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
छावा फिल्म बघितल्यानंतर सर्व लोक हाजीअली मध्ये शिरले.
हा दावा खोटा आहे. शिवसेना, युवासेना आणि हिंदू मंचच्या कार्यकर्त्यांनी कल्याण येथील मलंग गडावरील केलेल्या आरतीचा व्हिडीओ खोटा दावा करून शेयर केला जात आहे.
छावा फिल्म बघितल्यानंतर सर्व लोक हाजीअली मध्ये शिरले असा दावा करीत एक व्हिडीओ सध्या शेयर केला जात आहे.
हा दावा चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ सोबत एक हिंदी कॅप्शनसुद्धा जोडण्यात आली आहे. “मुंबई:- हाजी अली दरगाह मे गूंजा जय श्री राम का जयघोष” अशी ती कॅप्शन आहे. काही कार्यकर्ते जय श्रीराम म्हणत एका दर्गा सदृश्य वास्तूत प्रवेश करताना दिसतात आणि ते आरती करतात. १.२१ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळते. व्हिडीओ शेयर करताना “थेटर मध्ये छावा फिल्म बघितल्यानंतर शो सुटल्यानंतर ,सर्व लोक हाजी अली मध्ये शिरले” अशी मराठी कॅप्शन देण्यात येत आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील अभिनेता विकी कौशल अभिनित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर होत असलेल्या दाव्यांच्या क्रमाने हा दावा केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओच्या तपासासाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये आम्हाला ‘जय श्री राम’ घोषा बरोबरच “आई भवानी शक्ती दे, मलंग गडाला मुक्ती दे’ अशा घोषणाही ऐकायला मिळाल्या. जर संबंधित जमाव हाजी अली दर्ग्यात शिरलेला असेल तर त्याठिकाणी मलंग गडासंदर्भात घोषणा कशा काय दिल्या जातील? असा संशय आम्हाला आला.
दरम्यान आम्ही ‘हाजी अली मध्ये शिरला जमाव’ असे कीवर्ड्स Google वर शोधून पाहिले. मात्र अशी घटना घडल्याचे कोणतेही न्यूज रिपोर्ट आम्हाला मिळाले नाहीत. इतकी मोठी घटना हाजी अली दर्ग्यात घडली असती तर त्याच्या मोठ्या बातम्या झाल्या असत्या. मात्र तसे आढळले नाही.
पुढील तपासासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही की फ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. दरम्यान या व्हिडिओचा वापर करून केल्या गेलेल्या असंख्य पोस्ट आम्हाला मिळाल्या. त्या येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील. या पोस्टमध्ये संबंधित कृती ही मलंग गडावरील हाजी मलंग दर्गा किंवा मच्छिन्द्रनाथ समाधी मंदिर येथे झाल्याचे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
या पोस्टवरून संबंधित व्हिडीओ हा मलंग गडावरील असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही येऊ शकलो. दरम्यान मलंग गडावर हा जमाव का जमला होता हे शोधताना आम्हाला महा MTB या माध्यमाच्या फेसबुक पेजवर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला. “मलंगगडावर आरती करताना उपमुख्यमंत्री शिंदे कल्याण: मलंगगडावर माघ पौर्णिमेनिमित्त आरती करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.” अशा शीर्षकाखाली हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या ठिकाणीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंख्य कार्यकर्त्यांसोबत आरती करताना दिसत आहेत.
दरम्यान अधिक जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोशल मीडिया अकाउंट शोधले. दरम्यान त्यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून १३ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेली एक व्हिडीओ पोस्ट आम्हाला पाहायला मिळाली.
“मलंगगड, ठाणे येथे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी मलंगगड उत्सवात सहभागी होऊन श्री मच्छिंद्रनाथांचे मनोभावे दर्शन घेतले.” असे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले होते.
यामुळे आम्ही या गडासंदर्भात आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आम्हाला नवभारत टाइम्स ने प्रसिद्ध केलेले ३१ मार्च २०२१ चे एक वृत्त सापडले. मलंगगडावर २८ मार्च २०२१ रोजी उत्सवादरम्यान दोन धार्मिक गटात वाद झाल्याचे हे वृत्त सांगते.
“ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंदरनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते. नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे १३व्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत सूफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे दुसरी बाजू मानते. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. ८० च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे,” असे हे वृत्त सांगते.
तेहेलका आणि बीबीसी सारख्या नामांकित संस्थांनीही याच धर्तीवर वृत्त प्रकाशित केले होते.
इतकी माहिती मिळाल्यानंतर आम्ही या वादात सुरुवातीपासून असलेले आणि शिवसेनेच्या पहिल्या काळापासून सक्रिय असलेले नेते रवी कपोते यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यांनी “व्हायरल व्हिडीओ हाजी अली नव्हे तर याचवर्षी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी मलंगगड उत्सवात झालेल्या आरतीच्या वेळीचा असल्याचे” आम्हाला सांगितले. युवासेनेच्या कार्यात असलेले आणि या व्हिडिओत दिसणारे अक्षय एखांडे यांचा दूरध्वनी क्रमांकही त्यांनी आम्हाला मिळवून दिला.
आम्ही अक्षय एखांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना “व्हायरल होत असलेला दावा पूर्णपणे खोटा आणि चुकीचा असल्याचे सांगितले. दरवर्षी शिवसेना, युवासेना आणि हिंदू मंच तसेच सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने माघी पौर्णिमेला मलंग गडावर हा उत्सव होतो. यावर्षीही १२ फेब्रुवारी २०२५ रोजी हा उत्सव झाला. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. छावा चित्रपट पाहून कार्यकर्ते हाजी अली दर्ग्यात शिरले हा दावा खोटा आहे.” असे त्यांनी सांगितले.
माघ पौर्णिमेला हिंदुत्ववादी कार्यकर्ते मलंग गडावर का जमतात आणि येथील वाद काय आहे? हे जाणून घेण्यासाठी न्यूजचेकरने केलेले एक्सप्लेनर येथे वाचता येईल.
शिवसेना, युवासेना आणि हिंदू मंचच्या कार्यकर्त्यांनी कल्याण येथील मलंग गडावरील केलेल्या आरतीचा व्हिडीओ खोटा दावा करून शेयर केला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Facebook post by maha MTB on February 13, 2025
Tweet made by Eknath Shinde on February 13, 2025
Conversation with Shivsena Leader Ravi Kapote
Conversation with Yuva sena Leader Akshay Ekhande
Article published by BBC
Article published by Tehelka.com
Article published by Hindusthan post
Prasad S Prabhu
February 20, 2025
Prasad S Prabhu
February 15, 2023
Yash Kshirsagar
April 6, 2021