Monday, April 28, 2025

Fact Check

Fact Check: आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत? खोटा आहे हा दावा

Written By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Dec 4, 2023
banner_image

Claim
आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे.

Fact
हा दावा खोटा आहे. महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही योजना जारी केलेली नाही.

आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वापरून शासनाने असा निर्णय घेतल्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरता येणार. असा दावा एका बातमीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

znews24.agrinews24tas.in या वेबसाईटच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला असून याचा स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहे. दावा करणाऱ्या व्यक्ती व्हाट्सअपवर संबंधित बातमीची लिंक सुद्धा जोडत आहेत.

Fact Check: आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत? खोटा आहे हा दावा
Courtesy: znews24.agrinews24tas.in

या बातमीचे संग्रहण येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत? खोटा आहे हा दावा

Fact Check/Verification

न्यूजचेकरने मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असलेल्या या बातमीचा आणि त्यामधील दाव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सर्वप्रथम ‘महाराष्ट्र शासन महिलांना बसप्रवासात १०० टक्के सवलत’ या किवर्डचा वापर करून गुगलवर शोध घेण्यात आला. मात्र आम्हाला अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आल्याचे दिसून आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा महाराष्ट्र सरकारने इतका मोठा निर्णय घेतला असल्यास त्यासंदर्भातील घोषणा किंवा माहिती देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होणे अपेक्षित असते. मात्र असे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स आम्हाला मिळाले नाहीत. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या यापूर्वी सुरु असलेल्या महिलांसाठीच्या ५० टक्के बसप्रवास सवलत योजनेची माहिती आम्हाला मिळाली.

Fact Check: आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत? खोटा आहे हा दावा
Google Search Results

“संबंधित ५० टक्के सवलत योजना १७ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात ९ मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती. बसप्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात १७ मार्च पासून योजनेला प्रारंभ झाला.” अशी माहिती आम्हाला महाराष्ट्र टाइम्सने १७ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत वाचायला मिळाली.

Fact Check: आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत? खोटा आहे हा दावा
Screengrab of Maharashtra Times

यासंदर्भात पुढारी, Zee २४ तास आणि ABP माझा आदी माध्यमांनीही बातम्या प्रसिद्ध केल्या असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

व्हायरल दाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे १०० टक्के सवलतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत X खाते तसेच फेसबुक पेजही धुंडाळून पाहिले. मात्र बस प्रवासासंदर्भात अशी कोणतीही योजना त्यांनी जाहीर केल्याचे आमच्या पाहणीत आले नाही.

दरम्यान आम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर याप्रकारची कोणती घोषणा झाली आहे का? याचा शोध घेतला. आम्हाला व्हायरल दाव्याला पुष्टी देणारी कोणतीच माहिती हाती आली नाही. दरम्यान आम्हाला “रा.प.महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना” अशी माहिती वेबसाईटच्या सेवा या विकल्पामध्ये वाचायला मिळाली.

Fact Check: आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत? खोटा आहे हा दावा
Screengrab of MSRTC Website

मात्र याठिकाणी दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये महिलांना बसप्रवासात १०० टक्के सवलत दिली जात असल्याचे लिहिण्यात आलेले नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आम्ही वेबसाईटच्या संपर्क या विकल्पामधून महामंडळाच्या सहा.जनसंपर्क अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी यांचा क्रमांक मिळविला. या कार्यालयात संपर्क साधला असता, अशाप्रकारे कोणतीही १०० टक्के सवलतीची योजना महाराष्ट्र सरकारने किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली नाही. तसा कोणताही आदेश आलेला नाही. अशी माहिती मिळाली.

आम्ही महाराष्ट्रातील मुंबई येथील मुंबई सेंट्रल या बसस्थानकाशी संपर्क साधला, तेथील जनसंपर्क विभागानेही “व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याची” माहिती आम्हाला दिली. “हा दावा व्हायरल झाल्याने अनेक महिला प्रवासी पूर्णपणे मोफत प्रवासाची मागणी करीत आहेत. मात्र अधिकृतपणे कोणतीच घोषणा झालेली नसल्याने अशी सवलत दिली जात नाही.” अशी माहितीही आम्हाला देण्यात आली.

दरम्यान आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले. महिलांना १०० टक्के बसप्रवासात सवलत योजना आजपासून म्हणजेच कोणत्या तारखेपासून याचाही स्पष्ट उल्लेख नसलेला हा दावा तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Conclusion

महिलांना बसप्रवासात १०० टक्के सवलत देण्याची सरकारची योजना असून आजपासून अंमलबजावणी सुरु आहे. असे सांगणारा व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Google Keyword Search
News published by Maharasthra Times on March 17, 2023
Official X and Facebook handles of Mr. Eknath Shinde, CM, Maharashtra
Official Website of MSRTC
Conversation with PR office of MSRTC
Conversation with PR office of Mumbai Central Bus stand


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.