Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
परिवहनच्या नव्या नियमानुसार महिलांना बसचे दुप्पट तिकीट लागेल.
हा दावा खोटा असून अशा बातम्या देणाऱ्या वेबसाईट स्कॅमचा भाग आहेत.
परिवहनचा नवा नियम लागू झाला असून आता महिलांना बसचे दुप्पट तिकीट मोजावे लागणार आहे. असा दावा काही वेबसाईटवर पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र वापरून यापुढे महिलांना मोफत प्रवास बंद असा दावा करण्यात आला आहे.


दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकरच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आणि संबंधित वेबसाईट्स स्कॅमचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.
sncollege.in आणि stjonesschool.in या URL मध्येच गडबड वाटणाऱ्या वेबसाईटसनी दिलेल्या बातम्या आम्ही काळजीपूर्वक वाचल्या. आम्हाला त्यातील मजकूर असंबंद्ध वाटला. व्हायरल दाव्यात सांगितलेला निर्णय कुणी घेतला? कधी जाहीर केला? याबद्दलची माहिती आम्हाला आढळली नाही.
दरम्यान आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून Google वर शोध घेतला. मात्र महाराष्ट्र सरकार किंवा परिवहन महामंडळाने अशाप्रकारचा निर्णय घेतल्याची माहिती कोठेच आढळली नाही. इतका मोठा निर्णय झाला असता तर नक्कीच त्याची मोठी बातमी झाली असती आणि अधिकृत माध्यमांनी ती प्रसिद्ध केली असती.
पुढील तपासात व्हायरल दावा खोटा आहे असे सांगणारी Dharashiv-धाराशिव 2.0 या न्यूज प्लॅटफॉर्मची १७ सप्टेंबर २०२५ ची फेसबुक पोस्ट मिळाली. यामध्ये परिवहन महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा हवाला देऊन दावे खोटे असल्याचे म्हटलेले होते.

यातून सुगावा घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर शोधले त्या ठिकाणी आम्हाला समाजातील विविध घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना या सदरात महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांसाठी सर्व प्रकारच्या बसेसच्या प्रवासात ५० टक्के ची सवलत असल्याची माहिती वाचायला मिळाली.

याचबरोबरीने आम्ही महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला, त्यांनीही “व्हायरल दावे खोटे असून, या प्रकारचे कोणतेही निर्णय महामंडळाने घेतलेले नाहीत. महिला प्रवाशासंदर्भातील ५0% ची सवलत कायम आहे. ती बदलण्याचा तसेच तिकीट दुप्पट करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.” अशी माहिती दिली.
संबंधित बातम्या दिलेल्या वेबसाईट संदर्भात तपास करण्यासाठी आम्ही वेबसाईटची विश्वासार्हता तपासणाऱ्या स्कॅम डिटेक्टर या टूलवर सर्वप्रथम sncollege.in ही पहिली वेबसाईट तपासली यावेळी या वेबसाईटचा विश्वासाचा स्कोर ८.१ % असल्याचे या टूलने सांगितले. यावेळेस या वेबसाईट वर अविश्वासू घातक आणि धोकादायक असे शेरे देत स्कॅम डिटेक्टरने युजरने विश्वास ठेवण्यास ही वेबसाईट अपात्र असल्याचे म्हटले.

दुसऱ्या वेबसाईट stjonesschool.in संदर्भातही स्कॅम डिटेक्टरने ९.९ % इतका विश्वासाचा स्कोर दिला असून समान शेरे दिले आहेत.

अशा प्रकारच्या वेबसाईट लिंकच्या माध्यमातून वाचकांचे लक्ष वेधून घेऊन त्याचा वापर चुकीच्या कारणासाठी साठी करत असल्याचे यापूर्वी न्यूजचेकरने केलेल्या तपासात स्पष्ट झालेले आहे.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात महिलांच्या बस तिकिटासंदर्भात केलेले दावे खोटे आणि स्कॅमचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Facebook post shared by Dharashivv 2.0 on September 17, 2025
MSRTC Website
Scam Detector
Telephonic conversation with MSRTC PRO Rohan Desai’s office
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025
JP Tripathi
October 9, 2025