Authors
Claim
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या 20%, 110 मुस्लिम खासदार निवडून आले.
ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
Fact
न्यूजचेकरने “मुस्लिम खासदार लोकसभा” साठी कीवर्ड शोध लावला, ज्यामुळे आम्हाला अनेक बातम्या मिळाल्या ज्यात समजले की, या वर्षी फक्त 24 मुस्लिम लोकसभेवर निवडून आले, 2019 पेक्षा दोन कमी. रिपोर्टनुसार, 2019 मध्ये लढलेल्या 115 मुस्लिम उमेदवारांच्या तुलनेत या निवडणुकीत 78 मुस्लिमांनी निवडणूक लढवली यामध्ये अपक्षांचाही समावेश आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण भारतभरात 110 मुस्लिम खासदार निवडून आल्याचा कोणताही रिपोर्ट आम्हाला आढळला नाही.
“आता लोकसभेच्या एकूण संख्याबळात मुस्लिमांचा वाटा फक्त 4.42% आहे, जो आतापर्यंतचा दुसरा सर्वात कमी वाटा आहे. 1980 मध्ये विक्रमी 49 मुस्लिम खासदार (सभागृहाचे 9.04%) निवडून आले आणि 1984 मध्ये 45 मुस्लिम खासदार (सभागृहाचे 8.3%) निवडून आल्यावर लोकसभेतील मुस्लिमांची संख्या कधीही 40 च्या वर गेली नाही,” असे 8 जून 2024 रोजीचा Indian Express चा रिपोर्ट सांगतो. एबीपी न्यूजचा तत्सम रिपोर्ट येथे पाहता येईल.
“NDA पक्षांमध्ये एकही मुस्लिम खासदार नसताना, INDIA गटात 7.9 टक्के मुस्लिम खासदार आहेत. त्याचप्रमाणे, NDA कडे एकही ख्रिश्चन खासदार नाही, तर INDIA ब्लॉकमध्ये 3.5 टक्के ख्रिश्चन खासदार आहेत. NDA मध्ये एकही शीख खासदार नाही तर INDIA ब्लॉकमध्ये शीख समुदायाचे 5 टक्के खासदार आहेत…एकूणच, यावेळी 24 मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत,” असे 7 जून 2024 रोजीचा मिंटचा रिपोर्ट सांगतो. असाच एक Print चा रिपोर्ट येथे पाहिला जाऊ शकतो, जो दावा केल्याप्रमाणे 110 नव्हे तर 24 मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले याची पुष्टी करतो.
Result: False
Source
Indian Express report, June 8, 2024
ABP News report, June 5, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा