Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महाराष्ट्राच्या हिंगोलीमध्ये १४ हजार महिलांमध्ये कर्करोग आढळला.
हिंगोली जिल्ह्यात १९ महिलांना कर्करोग झाला असल्याचे स्पष्ट झाले असून हा दावा दिशाभूल करणारा आहे.
महाराष्ट्राच्या हिंगोलीमध्ये १४ हजार महिलांमध्ये आढळला कर्करोग असा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“महाराष्ट्र के हिंगोली में एक साथ 14000 महिलाओं में कैंसर पाया गया। वैसे ये खबर उतनी इंपोर्टेंट नहीं है। (इंपोर्टेंट ये है कि मनसे के कार्यकर्ताओं ने आज किसको मराठी ना बोलने पर पीटा)” अशा हिंदी कॅप्शनसह हा दावा शेयर केला जात आहे.
न्यूजचेकरला तपासणीत हा दावा दिशाभूल करणारा आढळला.
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही दाव्यासोबत शेयर केला जात असलेला NDTV इंडियाचा लोगो असलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये महाराष्ट्र सरकारने केलेल्या संजीवनी मिशन अंतर्गत सर्वेक्षणात हिंगोली जिल्ह्यात १४ हजार महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली असल्याचे म्हटलेले असल्याचे ऐकायला येते. आम्ही किवर्ड सर्च आणि रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून संबंधित व्हिडीओचा मुख्य स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उपलब्ध झाला नाही.
पुढील तपासात आम्ही ‘हिंगोली कर्करोग महिला’ आदी किवर्ड सर्च करून पाहिले. यामध्ये आम्हाला १० जुलै २०२५ रोजी ई सकाळ ने प्रसिद्ध केलेली बातमी सापडली.

या वृत्तात महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्यात संजीवनी मोहिमेअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात १४ हजार ५०० महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे दिसली. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच ही माहिती विधानसभेत दिली आहे. या महिलांची चाचणी आणि तपासणी केल्यावर तीन महिलांना गर्भाशयाचा कर्करोग, एकीला स्तनाचा आणि आठजणींना तोंडाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. अशी माहिती वाचायला मिळाली.
१० जुलै २०२५ रोजीच PTI ने प्रसिद्ध केलेली बातमीही आम्हाला मिळाली. यामध्येही आम्हाला कुठेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १४ हजार ५०० महिलांना कर्करोग झाला असे म्हटल्याचे आढळले नाही. इतक्या महिलांमध्ये कॅन्सर सदृश लक्षणे आढळल्याचे आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितल्याचे बातमीत म्हटलेले आहे.

दरम्यान आणखी शोध घेताना आम्हाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याच विषयावर वृत्तसंस्था ANI ला १२ जुलै २०२५ रोजी दिलेली मुलाखत आढळली.
“महाराष्ट्र आरोग्य विभाग लोकांची, विशेषतः महिलांची आरोग्य तपासणी करत आहे. आम्ही ‘उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला’ या ब्रीदवाक्याचे पालन करत आहोत. आम्ही हिंगोलीत ३ लाख लोकांची आरोग्य तपासणी केली. त्यापैकी १९ जणांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून आली. अनेक लोकांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्याचे माध्यमांचे वृत्त बरोबर नाही. आकडेवारीत तफावत आहे…” असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केल्याचे आम्हाला दिसून आले.
अधिक माहितीसाठी आम्ही हिंगोली येथील सरकारी इस्पितळाशी संपर्क साधला. तेथे आम्हाला मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, “एकूण तीन लाख रुग्णांच्या आरोग्य तपासणीत केवळ १९ महिलांनाच कर्करोग झाला असल्याचे आढळले आहे.”
आम्ही हिंगोली जिल्हा माहिती खात्याशीही संपर्क साधला, तेथे “१४ हजार ५०० महिलांना कर्करोग झाला ही माहिती चुकीची असून फक्त १९ महिलांना कर्करोग झाला ही माहिती खरी आहे.” असे सांगण्यात आले.
अशाप्रकारे आमच्या तपासात महाराष्ट्राच्या हिंगोलीमध्ये १४ हजार महिलांमध्ये कर्करोग आढळला असे सांगणारा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे.
Our Sources
News published by Sakal on July 10, 2025
News published by PTI on July 10, 2025
Tweet Made by ANI on July 12, 2025
Conversation with Chief Medical Officer, District Hospital, Hingoli
Conversation with District Information Officer, Hingoli
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025
JP Tripathi
October 9, 2025