Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या बातम्या येत असताना,सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.व्हिडिओच्या सुरुवातीला गेटला बांधलेला कुत्रा झोपलेला दिसत आहे.पण काही सेकंदांनंतर अचानक गेट हलू लागते आणि कुत्रा उठून उभा राहतो.
दिल्ली आणि उत्तर भारतातील काही भागात नुकत्याच झालेल्या भूकंपाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.काही लोकांनी हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचा दावाही केला आहे. नुकत्याच झालेल्या भूकंपाशी लिंक करून अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत मंगळवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजली गेली आहे.नेपाळलाही भूकंपाचा धक्का बसला असून,त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.या संदर्भात कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यूट्यूबवर काही कीवर्डच्या मदतीने सर्च केल्यावर आम्हाला J & K TV नावाच्या चॅनलवर व्हायरल झालेला व्हिडिओ सापडला.हा व्हिडिओ 21 जानेवारी 2021 रोजी येथे अपलोड करण्यात आला होता.हा व्हिडीओ जुना असल्याचे येथेच स्पष्ट होते.
व्हिडीओसोबत टायटलमध्ये लिहिले आहे की, हा डेवाओ (Davao) भूकंपाचा व्हिडिओ आहे.याशिवाय 20 जानेवारी 2021 रोजी 7.1 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाल्याचेही सांगण्यात आले आहे.इंटरनेटवर शोध घेतल्यावर आम्हाला कळले की डेवाओ (Davao) हे फिलीपिन्समधील एक शहर आहे,जिथे 21 जानेवारी 2021 रोजी 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
यूट्यूब व्हिडिओ पाहता हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे दिसते.यासोबतच या व्हिडीओसोबत आणखी काही माहितीही देण्यात आली आहे,ज्यावरून असे दिसते की हा व्हिडिओ कुत्र्याच्या मालकाने यूट्यूबवर शेअर केला आहे.मात्र,हा व्हिडीओ कुठून आणि कधीचा आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही.पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हा व्हिडिओ दीड वर्षांहून जुना आहे.
आमची तपासणी पुष्टी करते की व्हायरल व्हिडिओचा दिल्ली-एनसीआरमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाशी काहीही संबंध नाही.जुना व्हिडिओ सध्याचा असे सांगून शेअर केला जात आहे.
Our Sources
Video uploaded by YouTube Channel J & K TV
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
October 22, 2024
Runjay Kumar
August 6, 2024
Komal Singh
July 29, 2024