Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कोठूनतरी एक पक्षी येतो आणि ध्वजस्थंभावर अडकलेला ध्वज फडकावून जातो असे दर्शविणारा एक व्हिडीओ केरळच्या गावात राष्ट्रध्वज फडकवणारा पक्षी असे सांगून व्हायरल करण्यात आला आहे.
अशाप्रकारच्या पोस्टच्या संग्रहित आवृत्ती येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

हा व्हिडीओ केरळमधील असल्याचा दावा होत असल्याने आम्ही मल्याळम कीवर्ड वापरून कीवर्ड शोधत घेतला, आम्हाला त्याच घटनेचा दुसऱ्या अँगलमधून चित्रित केलेला व्हिडिओ 17 ऑगस्ट, 2024 रोजी प्रभाकरन कुट्टोथ या युजरने शेअर केलेला असल्याचे आढळले. व्हिडिओत एक कावळा ध्वज स्थंभाच्या मागे असलेल्या नारळाच्या झाडाकडे उडत येऊन बसताना स्पष्टपणे दिसतो. ध्वज फडकवल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट ऐकून कावळा उडून जात असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आम्हाला 18 ऑगस्ट 2024 रोजी 24 News ने YouTube वर शेअर केलेला आणखी एक व्हिडिओ सापडला आहे जो नारळाच्या झाडावर बसलेला कावळा दाखवत आहे. या व्हिडिओने स्पष्ट केले आहे की ऑप्टिकल इल्युजनचा प्रकार येथे घडला असून ज्यामुळे अनेक युजर्सना कावळ्यानेच ध्वज फडकावला यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले.

आम्ही पुढे मामपद पंचायतीचे प्रभाग क्रमांक 7 चे सदस्य शिहाब यांच्याशी संपर्क साधला, ते व्हिडिओमध्ये ध्वज फडकावताना दिसत आहेत. “हे कट्टुमुंडा, मारमंगलम येथील एका अंगणवाडीत घडले,” असे ते म्हणाले, “व्हायरल व्हिडिओ ज्या विचित्र अँगलमध्ये चित्रित करण्यात आला होता, त्यामुळे असे दिसते की कावळ्याने ध्वज फडकवण्यास मदत केली होती.” अशी माहिती त्यांनी दिली.
Sources
Facebook post by Prabhakaran Kuttoth on August 17, 2024
YouTube video by 24 News on August 18, 2024
Telephone Conversation with Shihab, Member Mambad Grama Panchayat
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Sabloo Thomas
October 24, 2025
Ishwarachandra B G
August 18, 2025
Prasad S Prabhu
August 17, 2025