Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि फातिमा शेख यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमिर खानने तिसरे लग्न केल्याचा दावा केला जात आहे.
बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याच्या चित्रपटांमुळे आणि सामाजिक कार्यातील सहभागामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण जुलै 2021 मध्ये पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता आमिर खान सतत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असतो. या एपिसोडमध्ये त्याच्या तिसऱ्या लग्नाची बातमी एका फोटोसह व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फातिमा खान अभिनेता आमिर खानसोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिरसोबत दंगल चित्रपटात काम करणारी फातिमा साडी नेसलेली दिसत आहे आणि तिच्या भांगात कुंकू देखील दिसत आहे.
फोटो शेअर करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘फातिमा शेख ही अभिनेता आमिर खानची तिसरी बेगम बनली आहे, फातिमा शेख तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका केली होती. बरं ही त्याची वैयक्तिक बाब आहे, आमिर खानने लग्न झाल्याचे कितीही सांगितले तरी अभिनेता आमिर खानची मुलगी इरा हिने सत्य उघड केले आहे.

या पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहू शकता.
हे अभिनेता आमिर खानचे तिसरे लग्न असल्याचा दावा करत आणखी एका युजरने ट्विट केले की, ‘ही आमिर खानची वैयक्तिक बाब आहे, असे सांगून अनेकजण सुटतील, पण हा आमिर खान आहे जेव्हा सत्यमेव जयतेमध्ये बहुविवाह, हुंडाप्रथा, याबद्दल ज्ञान पाजळतो पण त्याला स्वतःचा कारनामा आठवत नाही का, म्हणूनच इस्लाममध्ये हलाला, मुताह, चार विवाह या सर्व कुप्रथा न्याय्य आहेत?’

त्याचबरोबर यूट्यूबवर बॉलीवूड सिटी नावाच्या चॅनलनेही अभिनेता आमिर खान आणि फातिमाच्या लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सध्या व्हायरल झालेला हा फोटो दिसत आहे. हा व्हिडिओ 41 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

अभिनेता आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून जुलै २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. गेल्या 15 वर्षांपासून दोघांचे लग्न होते आणि घटस्फोटानंतर आमिर आणि फातिमा यांच्या लग्नाची मीडिया आणि बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा आहे. इतकेच नाही तर घटस्फोटाची बातमी आल्यापासून सोशल मीडियावर अनेक यूजर्स आमिर खानला धार्मिक रंग देऊन ट्रोल करत आहेत. काही मीडिया पोर्टल्स असा दावा करत आहेत की आमिर तिसरे लग्न करणार आहे आणि तो त्याचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यानंतर याच खुलासा करेल, माऑत्र आमिर खान आणि फातिमा शेख यांच्याकडून लग्नाबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
अभिनेता आमिर खानने तिसरे लग्न केल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेल्या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही इनव्हिड टूलच्या मदतीने तयार केलेली कीफ्रेम रिव्हर्स इमेच्या साहाय्याने शोधली. या दरम्यान म्हाला Yandex Image Search वर व्हायरल झालेल्या फोटोचा YouTube व्हिडिओ सापडला.

यांडेक्स सर्चमधून मिळालेला YouTube व्हिडिओ 2018 सालचा आहे, ज्यामध्ये आमिर खान त्याची पत्नी किरण रावसोबत मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी झाल्याचा आहे.

व्हिडिओमध्ये अभिनेता आमिर खान आणि किरण राव दोघेही एक मिनिट आणि पाच सेकंदादरम्यान फोटो सेशन करताना दिसत आहेत.
यानंतर, आम्ही आकाश अंबानीच्या एंगेजमेंटसंबंधी फोटो सर्च केले. यादरम्यान आम्हाला न्यूज18 ची फोटो गॅलरी मिळाली. यामध्ये आमिर खान आणि किरण राव दिसत आहेत.

किरण राव ही त्यावेळी म्हणजेच जुलै २०१८ मध्ये आमिर खानची पत्नी होती. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या एंगेजमेंटला अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत आमिर खान आणि फातिमा शेख यांच्या लग्नाचा दावा करणारा जो फोटो व्हायरल होत आहे तो फोटोशॉप केलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाश अंबानीच्या एंगेजमेंटला गेलेल्या आमिर आणि किरण रावच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आणि मूळ फोटो यांच्यातील फरक खाली पाहता येईल.

अशा प्रकारे आमच्या पडताळणीत अभिनेता आमिर खान आणि फातिमा शेख यांच्या लग्नाच्या दाव्यासह व्हायरल होत असलेले फोटो फोटोशॉपच्ड असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ फोटो आमिर खान आणि किरण राव यांचा आहे.
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
June 25, 2025
Prasad S Prabhu
May 17, 2025
Prasad S Prabhu
May 15, 2025