Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
शेतकरी आंदोलनामुळे रस्ता ठप्प झाल्यामुळे नाराज, एक वृद्ध महिला आंदोलकांवर संतापताना दिसत आहे.
Fact
व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. हा व्हिडिओ 2022 सालचा आहे.
शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंजाब ते दिल्ली असा 12 प्रमुख मागण्या घेऊन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. एकीकडे शेतकरी अमृतसर दिल्ली-राष्ट्रीय महामार्गावरून हरियाणात प्रवेश करण्याच्या तयारीत होते, तर अंबाला येथील शभुन सीमा पूर्णपणे सील करण्यात आली.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडणारा आंदोलकांवर संतप्त झालेल्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलनामुळे रस्ता जाम झाल्यामुळे वृद्ध महिला नाराज आणि संतप्त होताना दिसत आहेत. 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पोस्टमधील व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पंजाब में आम लोग राज्य में रोजाना हो रहे विरोध प्रदर्शनों से तंग आ चुके हैं। बुजुर्ग महिला किसानों को कोसते हुए कह रही हैं कि ‘केंद्र आपको सब कुछ मुफ्त दे रहा है, फिर भी जनता को परेशान करते हुए सड़कें जाम कर रहे है।’
झी उत्तर प्रदेश-उत्तराखंडनेही सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी जोडत हा व्हिडिओ शेअर केला आहे. नोंदवल्याप्रमाणे, “किसान आंदोलनकारियों पर फूटा महिला का गुस्सा, खूब सुनाई खरी-खरी।” असे शीर्षक असून डिस्क्रिप्शन मध्ये, “किसान आंदोलन से दिल्ली एनसीआर की रफ्तार फिर थमने लगी है। इसी बीच एक अधेड़ महिला का वीडियो वायरल हो रहा है। इस वीडियो में महिला आंदोलनकारियों पर गुस्सा करते हुए कह रही हैं कि “तुम्हारी मांगें कभी खत्म नहीं होती हैं। केंद्र सरकार इतना कुछ मुफ्त में दे रही है फिर भी तुम जाम लगा कर सड़क पर बैठ जाते हो।” असे लिहिण्यात आले आहे.
13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चौकशी करण्यासाठी, आम्ही त्याच्या मुख्य फ्रेम्सचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. यादरम्यान, आम्हाला फोकस पंजाब ते आणि स्क्रोल पंजाब नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ मिळाला, जो नोव्हेंबर 2022 मध्ये शेअर करण्यात आला होता. यावरून हा व्हिडिओ एक वर्षाहून जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या व्हिडिओशी संबंधित अधिक माहितीसाठी आम्ही पंजाबी ट्रिब्यूनचे रिपोर्टर दर्शन मीथा यांच्याशीही बोललो. फोनवरील संवादादरम्यान त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा नसून जुना आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी घटना संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या शेवटच्या शेतकरी आंदोलनाच्या समाप्तीनंतर घडली आहे. ते पुढे म्हणाले की, आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी अनेक गट तयार केले. असाच एक शेतकरी गट राजपुराजवळ रास्ता रोको करून संपावर बसला होता. या धरणे आंदोलनामुळे व्हिडिओत दिसणाऱ्या वृद्ध महिलेला वाहतुकीत अडचणी आल्या, त्यामुळे ती आंदोलकांवर संतप्त झाली.
आमच्या तपासणीतून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो की व्हायरल झालेला व्हिडिओ सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा नसून 2022 सालचा आहे.
Sources
Video posts shared by facebook users in 2022.
Phonic conversation with Punjabi Tribune reporter, Darshan Mitha
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 15, 2025
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025