Authors
Claim
NDA ला पाठिंबा दिल्याबद्दल आंध्रमध्ये आंदोलकांनी चंद्राबाबू नायडू यांचा फोटो जाळला.
Fact
विधानसभेच्या जागेवरून TDP उमेदवार म्हणून गुम्मनूर जयराम यांना उमेदवारी दिल्याबद्दल राज्याच्या निवडणुकीपूर्वी आंध्रच्या गुंटकलमध्ये झालेला निषेध व्हिडिओमध्ये दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एका दिवसानंतर, NDA ने बुधवारी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्याचा ठराव संमत करून मोदी 3.0 सरकारची पुष्टी केली. यावेळी टीडीपीने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने, आंदोलकांनी चंद्राबाबू नायडू यांच्या छायाचित्राची मोडतोड करून ते पेटवून दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी 33 सेकंदांचे फुटेज शेअर करत दावा केला की, “आंध्र प्रदेशातील संतप्त लोक NDA ला पाठिंबा दिल्याबद्दल चंद्राबाबू नायडूंचे फोटो जाळत आहेत.”
तथापि, न्यूजचेकरला आढळले की व्हिडिओमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश राज्य निवडणुकीसाठी गुंटकल विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून गुम्मनूर जयराम यांचे नाव दिल्याबद्दल TDP नेत्याचा निषेध नोंदविण्यात आला होता तेंव्हाचा हा व्हिडीओ आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर Google लेन्सच्या शोधामुळे आम्हाला @SajjalaBhargava च्या 29 मार्च 2024 रोजीच्या फेसबुक पोस्ट कडे नेले. या पोस्टमध्ये व्हायरल फुटेज सोबत, “गुंटकल TDP मध्ये आग (Google द्वारे तेलुगुमधून भाषांतरित)” असे म्हटले आहे.
एक सुगावा घेऊन, आम्ही Google वर “गुंटकल,” “चंद्राबाबू नायडू फोटो” आणि “फायर” हे कीवर्ड पाहिले, ज्यामुळे आम्हाला मार्च 2024 चा Samayam Telugu चा व्हिडिओ रिपोर्ट मिळाला. त्यात व्हिडिओची छोटी आवृत्ती दर्शविली गेली आहे आणि लिहिले आहे की, “गुंटकल टीडीपी कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडूचा फोटो जाळला आणि गुम्मनूर जयरामचा निषेध केला”.
हाच व्हिडीओ त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर 29 मार्च 2024 रोजी अपलोड करण्यात आला होता.
मार्च 2024 च्या न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनग्राब दाखवण्यात आला होता, “शुक्रवारी गुंटकलमध्ये गुम्मनूर जयराम यांना पक्षाचे तिकीट वाटप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत TDP कॅडरने प्रचार सामग्री पेटवली.” असे त्यात म्हटलेले आहे.
पुढे, “त्यांनी असाही दावा केला की अलीकडेच टीडीपीमध्ये सामील झालेल्या जयराम यांच्याकडून 30 कोटी रुपये घेऊन त्यांना तिकीट देण्यात आले. तिरुपती जिल्ह्यातील सत्यवेदूमध्ये, टीडीपी कॅडरने YSRC मधून अलीकडेच पक्षात सामील झालेल्या कोनेती आदिमुलम यांना उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयालाही जोरदार विरोध झाला होता.
29 मार्च 2024 च्या हिंदू मधील रिपोर्टनेही याची पुष्टी केली आणि म्हटले आहे की, “तेलगू देसम पार्टी (टीडीपी) च्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी डी. व्यंकटेश्वर प्रसाद आणि गुम्मनूर जयराम यांची उमेदवार म्हणून घोषणा झाल्याचा राग मनात धरून अनंतपूर आणि गुंटकलमध्ये पक्ष कार्यालयांची तोडफोड आणि फर्निचरला आग लावल्यानंतर सौम्य तणाव निर्माण झाला.”
मोठ्या प्रमाणात प्रसारित फुटेजमध्ये पाहिलेले स्थान Google Map वर शोधण्यात आम्ही यशस्वी झालो.
YSRCP सरकारमध्ये मंत्री असलेले Gummanur Jayaram या वर्षी मार्चमध्ये TDPमध्ये सामील झाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या आंध्र राज्य निवडणुकीत गुंटकल विधानसभा जागा जिंकली आणि त्यांच्या मागील पक्षाच्या उमेदवाराचा 6,826 मतांच्या फरकाने पराभव केला.
हे सुद्धा वाचा: Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण असल्याचे सांगत व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घ्या
Conclusion
अशा प्रकारे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की गुम्मनूर जयराम यांना TDP उमेदवार म्हणून नामांकन केल्याबद्दल राज्य निवडणुकीपूर्वी आंध्रच्या गुंटकलमध्ये निषेध दर्शविणारा व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेयर केला गेला आहे.
Result: False
Sources
Facebook Post By @SajjalaBhargava, Dated March 29, 2024
YouTube Video By Samayam Telugu, Dated March 29, 2024
Report By The New Indian Express, Dated March 30, 2024
Google Images
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा