Authors
Claim
केरळमध्ये मंदिराचे पुजारी पद मिळविण्यासाठी मुस्लिम शिक्षक मुस्लिमांच्या एका वर्गाला संस्कृत शिकवत आहेत.
Fact
केरळमधील एका इस्लामिक संस्थेत दुसऱ्या धर्माविषयी ज्ञान आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना हिंदू धर्मग्रंथातील महत्त्वाचे उतारे संस्कृतमध्ये शिकवले जातात.
केरळमधील मंदिरांमध्ये पुजारी पद मिळविण्यासाठी मुस्लिम शिक्षक मुस्लिमांच्या एका वर्गाला संस्कृत शिकवत असल्याचा दावा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की लांब पांढरे कपडे परिधान केलेले आणि डोक्यावर जाळीच्या टोप्या घातलेले विद्यार्थी वर्गात बसले आहेत आणि संस्कृत श्लोकांचे पठण केले जात आहे. मग एक शिक्षक एका विद्यार्थ्याला संस्कृत श्लोक म्हणायला सांगतात आणि विद्यार्थी श्लोक म्हणायला लागतो. दुसऱ्या शॉटमध्ये शिक्षक संस्कृतमध्ये काहीतरी शिकवत आहेत आणि सर्व विद्यार्थी त्याच्या नोट्स काढत आहेत. व्हिडिओंमधील बहुतांश संभाषण मल्याळममध्ये आहे.
Fact Check/Verification
व्हिडिओसोबत The Fourth न्यूजचा लोगो जोडलेला आहे आणि व्हिडिओमध्ये The Fourth चे नाव दिसत आहे. शोधल्यावर कळले की The Fourth हे मल्याळम भाषेचे न्यूज पोर्टल आहे. व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आम्ही The Fourth चे दिग्दर्शक बी. श्रीजन (B. Sreejan) यांच्याशी बोललो.
त्यांनी आम्हाला सांगितले, “होय, हा व्हिडिओ आमच्या रिपोर्ट मधून घेण्यात आला आहे, परंतु आमच्या रिपोर्टचा संदर्भ पूर्णपणे वेगळा होता. व्हिडिओसह शेअर करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. ही एक सकारात्मक स्टोरी होती. जवळपास वर्षभरापूर्वी 1 नोव्हेंबर 2022 रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले होते की एका इस्लामिक संस्थेत, जिथे मुस्लिम विद्यार्थ्यांना इमाम बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तिथे संस्कृतचा अभ्यासक्रमही शिकवला जातो, कारण ही संस्था भारतात कार्यरत आहे, त्यामुळे हिंदू धार्मिक ग्रंथ जाणून घेण्यासाठी त्यांनी संस्कृतचा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. त्यांनी आम्हाला पुढे सांगितले की, “आमचा व्हिडिओ इमाम बनण्यास शिकवणारी संस्था विद्यार्थ्यांच्या जागरूकता आणि ज्ञानासाठी आपल्या अभ्यासक्रमात संस्कृत आणि हिंदू धर्मग्रंथांचा समावेश कसा करते याबद्दल होता.” The Fourthने शेअर केलेला व्हिडिओ येथे पाहता येईल.
आमचा तपास पुढे नेत, आम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कॉलेज अकादमी ऑफ़ शरिया एंड एडवांस्ड स्टडीज (Academy of sharia and advanced studies)चे प्राचार्य ओणमपिल्लै मुहम्मद फ़ैज़ी (Onampilly Muhammed Faizy)यांच्याशी बोललो. त्यांनी व्हायरल दावा साफ फेटाळून लावला. “आमचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना इस्लामिक ज्ञानाबरोबरच इतर धर्मांबद्दल आणि त्यांच्या धर्मग्रंथांबद्दल जाणून घेण्याची आणि भारतीय संस्कृतीची महानता अनुभवण्याची संधी देतो,” असे त्यांनी आम्हाला सांगितले. येथे विद्यार्थी मल्याळम, अरबी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू भाषा, कायदेशीर व्यवस्था आणि सार्वजनिक प्रशासनात ज्ञान प्राप्त करतात. आमचे विद्यार्थी उज्वल भविष्याचे समर्थक बनतील. हा कोर्स त्यांना चांगले इस्लामिक विद्वान बनवण्यासाठी आहे. त्यांना मंदिराचे पुजारी बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येते, हा दावा खोटा आहे.”
मुस्लीम शिक्षक मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवत असल्याचे दाव्यात सांगितले जात आहे, तर आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हिडिओमध्ये दिसणारे शिक्षक मुस्लिम नाहीत. त्यांचे नाव रमेश असून ते या संस्थेत विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवतात.
या बातमीवर अनेक सकारात्मक मीडिया रिपोर्ट्स प्रसिद्ध झाल्याचेही आम्हाला आढळून आले. यातील काही रिपोर्ट इथे, इथे आणि इथे वाचता येतील.
13 नोव्हेंबर 2022 रोजी नवभारत टाइम्सने लिहिले आहे की, “केरल के इस इस्लामिक संस्थान में मुस्लिम छात्रों को पढ़ाई जाती है गीता, वेद, उपनिषद, संस्कृत में ही होती है बात।” आणि 13 नोव्हेंबर 2022 रोजी ‘द प्रिंट’ने लिहिले होते, “केरल के इस्लामिक संस्थान ने संस्कृत पढ़ाकर कायम की मिसाल!”
Conclusion
आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक वर्ष जुना आहे. हा व्हिडिओ अकादमी ऑफ शरिया आणि अॅडव्हान्स स्टडीज, केरळचा आहे. भगवद्गीता, उपनिषदे, महाभारत, रामायण यातील महत्त्वाचे उतारे केरळमधील एका इस्लामिक संस्थेत मुस्लिम विद्यार्थ्यांना दुसर्या धर्माबद्दल ज्ञान आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्कृतमध्ये शिकवले जातात. त्या अभ्यास वर्गाचा व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणारी व्यक्ती मुस्लिम नाही.
Result: False
Our Sources
Original video shared by The forth dated November 1, 2022.
Conversation with Mr. B. Sreejan, Director of The Forth
Conversation with Mr.Onampilly Muhammed Faizy , Principal of Academy of sharia and advanced studies
Report by Indian Express dated November 13,2022
Report by The Print dated November 13,2022
Report by Navbharat Times dated November 13,2022
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम कोमल सिंग यांनी केले आहे. ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा