Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
अहमदाबाद येथील विमान अपघाताचा फोटो.
हा फोटो पाच वर्षे जुना असून एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघातातील नव्हे तर केरळ अपघातातील आहे.
अहमदाबाद विमान अपघाताचा फोटो असे सांगत एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र आमच्या तपासात हा फोटो पाच वर्षे जुना असून एअर इंडियाच्या काझीकोड केरळ येथील अपघाताचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
गुजरातमधील अहमदाबाद येथे एक दुःखद आणि भयानक विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान AI-171 टेकऑफ दरम्यान कोसळले, त्यात एकूण 242 प्रवासी होते. या अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य उच्च पातळीवर सुरू आहे. तथापि, मृत आणि जखमींबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.
अशात हा फोटो व्हायरल झाला आहे. “अहमदाबाद वरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान विमानतळाजवळ उड्डाणानंतर काही वेळातच मेघाणीनगर परिसरात कोसळलं. विमानात 130 ते 242 प्रवासी असल्याची शक्यता आहे, जखमी आणि मृतांची अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट नाही असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.” अशा कॅप्शनसह व्हेरीफाईड युजरने हा दावा केला आहे.
व्हायरल फोटोच्या तपासासाठी आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला १४ ऑगस्ट २०२० रोजी CNBC TV 18 ने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली. या बातमीत व्हायरल फोटो उपस्थित आहे.

“एअर इंडिया एक्सप्रेस अपघाताच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन, ५ महिन्यांत अहवाल सादर करणार” अशा शीर्षकाच्या या बातमीत IX 1344 या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हायरल फोटोशी साधर्म्य असणारा फोटो आणि समान माहिती देणाऱ्या India.com आणि Moneycontrol च्या बातम्याही आम्हाला पाहायला मिळाल्या. यावरून अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या विमानाला झालेल्या गुरुवारच्या अपघाताशी व्हायरल फोटो संबंधित नाही.


अधिक तपासात व्हायरल छायाचित्रात दिसणाऱ्या IX 1344 या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात केरळ येथील काझीकोड विमानतळावर ७ ऑगस्ट २०२० रोजी झाला होता. ही माहिती आम्हाला ८ ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या Indian Express च्या बातमीत मिळाली. संबंधित वृत्त येथे पाहता येईल.

अशाप्रकारे आमच्या तपासात अहमदाबाद येथे झालेल्या अपघातातील एअर इंडियाच्या विमानाचा फोटो असे सांगत व्हायरल दावा पाच वर्षांपूर्वी झालेल्या विमान अपघातातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
News published by CNBC TV 18 on August 14, 2020
News published by India.com on August 13, 2020
News published by Moneycontrol on August August 13, 2020
News published by Indian Express on August 8, 2020
Sabloo Thomas
October 24, 2025
Ishwarachandra B G
August 18, 2025
Sabloo Thomas
August 21, 2024