Wednesday, April 24, 2024
Wednesday, April 24, 2024

HomeFact Checkशेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली? जाणून घ्या सत्य

शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली? जाणून घ्या सत्य

Authors

शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक यात एक व्यक्ती ट्रांस्फार्मरवर चढलेला दिसत आहे तर खालून काही लोक त्याला आवाज देत आहेत. पण तो कुणाचेच एेकत नाही, तो ट्रांसफार्मरचा खटका हाताने ओढतो त्यावेळी जाळ निर्माण होतो आणि तो खाली फेकला जातो.

पोस्टकर्त्याने म्हटले आहे की, “ही अवस्था आहे आज शेतकऱ्यांची…विजतोड,थकीत उसबिल,चुकीची विजबिले, दूध दर पिळवणूक, शेतीविषयक चुकीची धोरणे…..मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. शेतकऱ्यांच मरण हेच सरकारच धोरण. महाविकास आघाडी जाहीर निषेध”.

संग्रहित ट्विट इथे पहा.

हा दावा फेसबुकवर देखील शेअर होत आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतीसाठीच्या वीजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज बिलाअभावी शेतक-यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. यासाठी विविध ठिकाणी शेतक-यांनी मोर्चे काढले आहेत. तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आली आहेत. तसेच एका शेतक-याने  आत्महत्या केल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशातच शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Fact Check/Verification

शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य काय आहे हे? जाणून घेण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओतून काही कीफ्रेम्स इनव्हिडच्या मदतीने वेगळ्या केल्या आणि रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला. या शोधादरम्यान आम्हाला vikatan.com या तमिळ वेबसाईटवरील 8 जानेवारी 2020 रोजीच्या एका बातमीत या व्हिडिओशी मिळता जुळता फोटो आढळून आला. या बातमीनुसार हा व्हिडिओ एका चौकशी सुरु असलेल्या आर्मी जवानाचा असल्याची आहे. हा जवान मदुराई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच्या ट्रांसफार्मरवर चढला आणि त्याने खटका ओढून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या जवानाला हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या जवानाच्या पत्नीचे नुकतेच निधन झाल्याचा उल्लेख देखील या व्हिडिओत करण्यात आला आहे.

शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर
vikatan.com च्या बातमीचा स्क्रिनशाॅट

अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता टाईम्स ऑफ इंडियाची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, राजस्थानमध्ये पोस्टिंग असलेल्या जवान पी मुथ्थू वय 25 याने मदुराई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. ट्रांसफार्मरच्या झटक्याने तो 10 फूट उंचीवरुन फेकला गेला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार तो 20 टक्के भाजला असून त्याच्या हाताला मार लागला आहे. सध्या हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने घरगुती कारणावरुन विष घेतले होते तिचा हाॅस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला होता अशी महिती या बातमीत देण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा स्क्रिनशाॅट

Conclusion

अशा प्रकारे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर व्हायरल असलेला व्हिडिओ मुळात तामिळनाडूमधील एका लष्करी जवानाचा आहे. 

Result: Misleading

Our Sources

News by viktan.com
News By Times of India

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular