Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर हा लिहिलेला लेख.
हा दावा खोटा आहे. न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर हा लिहिलेला लेख लिहिलेला नाही.
न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर हा लिहिलेला लेख असा दावा करीत व्हाट्सअपच्या माध्यमातून एक मराठी टेक्स्ट मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
न्यूजचेकरला आमची व्हाट्सअप टीपलाइन (9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“मोदी कोण आहेत ? {अमेरिकन प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स मधील संपादक-लेखक जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.} ====== या व्यक्तीचा उदय जगासाठी धोका आहे, कारण, त्याने केवळ भारताच्या स्वार्थासाठी एकमेकांना शत्रू बनवले नाही.. तर त्याचा उपयोगही केला आहे. यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो. या व्यक्तीला ,भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे. जर या व्यक्तीला थांबवले नाही, तर भविष्यात असे होईल.. की एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल . तो एका विशिष्ट रणनीतीसह मार्गक्रमण करीत आहे.. आणि त्याची रणनीती त्याला काय करायचे आहे.. हे कोणालाही समजत नाही. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक खतरनाक राष्ट्रवादी देशभक्त लपलेला आहे. तो जगातील सर्व देशांचा उपयोग भारताच्या हितासाठी करीत आहे. अमेरिकेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी असलेले संबंध नष्ट करून , व्हिएतनामसारख्या त्यांच्या शत्रूंशी, मैत्री करुन.. आशियातील वर्चस्व संपुष्टात आणेल आणि आता मोदी चीनच्या विरोधात तीन देशांचा वापर करताना दिसेल . व्हिएतनाममध्ये चीनच्या दक्षिण समुद्र क्षेत्रात तेल उत्पादन करण्यास सुरवात केली, तेथील सर्व तेल भारताला दिले जाते, आणि भारतीय कंपनी रिलायन्सला काम करण्यास भाग पाडले, येथेही अमेरिकेचे वर्चस्व ,अस्तित्व संपुष्टात येईल. याक्षणी, चीनचा शत्रू व्हिएतनामवर अमेरिकेचे नियंत्रण आहे, जे भारताला फायदेशीर आहे. . चीन आणि अमेरिकेला एकमेकांविरूद्ध उभे करून, भारताने दोन्ही देशांकडून १.२ लाख कोटी डाँलर्सची गुंतवणूक करून घेतली.. जी आठ वर्षांत भारताला मिळू शकली नसती. आज, पाकिस्तानच्या जुन्या मित्रपक्षांना आपल्याकडे वळवून.. त्याद्वारे ही व्यक्ती पाकिस्तानला वेगळी करून भिकारी देशात रूपांतर करीत आहे, जसे की इराण येथे बंदर जे अफगाणिस्तानच्या सीमे जवळ आहे आणि भारतीय सैन्य स्टेशन अफगाणिस्तानच्या सिमेवर स्थापन झाले आहे. इराणला भारतीय व्यापाराची संधी देऊन पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तानला जाण्याचा मार्गही दर्शविला आहे. कलम ३७० व ३५ अ रद्द करून पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले . आता एक दिवस पीओके ताब्यात घेत संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात करून घेईल. व पाकिस्तानचे चार तुकडे पडतील . व , ते मोदीच्या इशाऱ्यावर नाचतील . पाकिस्तानचा पारंपारिक मित्र सौदी अरेबियालाही पाकिस्तान पासून वेगळे करण्यात मोलाचा वाटा असेल . या व्यक्तीने आशिया वरील चीन आणि अमेरिकेचे वर्चस्व संपवले आहे आणि सार्क परिषद रद्द करून,, आपली शक्ती जगाला दाखवून दिली आहे. आशियावर भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोदी यशस्वी झालेत … एशियातील रशिया आणि जपान या दोन महान शक्तींना मित्र बनवून हे साध्य केले आहे. आणि चीनच्या अधोगतीची सुरूवात केलीय , चीनने 1962 च्या युध्दात भारताचा लचका तोडून हस्तगत केलेला भूभाग , मोदीला स्वस्थ बसुन देत नाहिये.. त्याचा प्रत्यय 2015 पासुन मोदीनी व्हिएतनाम व मंगोलियाला आर्थिक मदत करून व तिथले तेल साठे असलेला भूभाग बिनासायास पदरात पाडून घेतले आहेत व चीनची सर्व बाजूनी कोंडी करून टाकलीय , भारता बरोबर चीनने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तर चीनच्या चौतरफा आक्रमण करून.. आज मोदी चीनचा नामोनिशान मिटवू शकतो, हे चीनला दोन महिन्यापूर्वीच कळून चुकलंय, हाँगकाँगला सपोर्ट करून युएन मध्ये साथ दिलीय , आता चीनला हाँगकाँग वेगळा करावाच लागेल . CPEC ची नाकाबंदी करण्यासाठी मोदी POK ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे , म्हणून चीन आज मोदीची आळवणी करून भारताला 40% पर्यंत हिस्सेदारी देण्यास तयार आहे , पण मोदी ऐकण्याच्या मनस्थीतीत नाही , त्यामुळे पाकिस्थाची अवस्था युध्द न करता मोदीनी भिकार्यासारखी करून ठेवलीय . त्यामुळे चीनचे 62 बिलीयन डाँलर पाण्यात गेल्यात जमा आहेत . अमेरिकन सरकार मध्ये लॉबिंग करून एमटीसीआर ( M T C R ) गटात मोदीनी भारताला स्थान मिळवून दिले आहे . आणि थोड्याच कालावधीत एनएसजी ( N S G ) मध्येही मोदी देशाची जागा पक्की करणार . जी पुढे जाऊन अमेरिकेसाठी त्रासदायक ठरेल . शिवाय, या व्यक्तीने भारतीय राजकारण एका वेगळ्या स्तरावर नेवून ठेवले आहे. जगाने असा विचार केला पाहिजे की सर्व देशांमध्ये एकमेकांचे बरेच शत्रू आहेत, परंतु पाकिस्तान शिवाय भारताचा दुसरा कोणी शत्रू नाही. ह्याचे समाधान भारता जवळ निश्चित आहे. हा माणूस सर्जिकल स्ट्राइकसारख्या डावपेचांचा वापर करू शकतो. हा माणूस वास्तविक प्रत्यक्ष युद्धा पेक्षा ही पाकिस्तानचे बरेच नुकसान करीत आहे. मुस्लिम देशांचा पाकिस्तान विरूद्ध वापर करून मोदींनी हे सिद्ध केले, की आज तो जगातील एक महान नेता आहे. या सर्व षडयंत्रांमध्ये या व्यक्तीचा मुत्सद्दीपणा,धुर्तता लक्ष देण्या सारखा आहे. जगातील इतर देशांकरिता भारताची ही प्रगती अडचणीची ठरेल . म्हणूनच,, मी जगातील सर्व विचारवंतांनी चर्चा आणि विचार करण्याच्या बाजूने आहे, सर्व राष्ट्रांना एकत्रित विरोधी संघटना उभी करावी.. ह्या विचाराचा मी पुरस्कार करतो . शक्य असल्यास भारतासारख्या मागासलेल्या देशाला, जगाचे महासत्ताक न बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा युनायटेड नेशन आणि सर्व मानव जातीला परिणाम सहन करावे लागतील . – जोसेफ हॉप +++ मोदीजी म्हणजे काय, तुम्हाला या लेखा द्वारे ,,, खूप चांगले समजले असेल… !!” असे या व्हायरल टेक्स्ट मेसेजमध्ये लिहिलेले आहे.
सर्वप्रथम आम्ही संबंधित किवर्डसच्या आधाराने न्यूयॉर्क टाइम्स या माध्यमाने अशापद्धतीचा कोणता लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लिहिला आहे का? हे Google वर शोधले. मात्र आम्हाला असा लेख आढळला नाही.
आम्ही न्यूयॉर्क टाइम्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नरेंद्र मोदी हे नाव शोधले. उपलब्ध लेखांच्या यादीत आम्हाला व्हायरल टेक्स्ट मेसेज मध्ये लिहिण्यात आलेल्या आशयाचा मजकूर असणारा कोणताच लेख मिळाला नाही.
न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या Editorial म्हणजेच संपादकीय विभागात अशाप्रकारचा कोणता लेख लिहिला आहे का? याची आम्ही पाहणी केली, मात्र तसे काहीच आढळले नाही.
न्यूयॉर्क टाइम्स मधील संपादक-लेखक जोसेफ हॉप यांनी हा लेख मूळ इंग्रजी भाषेत लिहिला आहे, असे आम्हाला व्हायरल टेक्स्ट मेसेज मध्ये वाचायला मिळाले, यावरून आम्ही न्यूयॉर्क टाईम्स कंपनीची वेबसाइट आणि त्याचे ‘अवर पीपल’ पेज तपासले.
यामध्ये आम्हाला कार्यकारी संपादक म्हणून ‘जोसेफ कान्ह’ कार्यरत असल्याचे समजले. कंपनीच्या कार्यकारी मंडळात किंवा कर्मचाऱ्याच्या यादीत कुठेही जोसेफ हॉप हे नाव आम्हाला आढळले नाही.
आणखी शोध घेताना न्यूयॉर्क टाइम्स कंपनीने ६ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या अधिकृत वेबसाईटवर संबंधित दाव्याचे खंडन करून हा दावा खोटा असल्याचे प्रसिद्ध केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
“सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनुकूल टिप्पण्यांचे श्रेय द न्यू यॉर्क टाईम्सचे काल्पनिक संपादक जोसेफ होप यांना देणाऱ्या मोठ्या संख्येने पोस्ट आम्हाला माहिती आहेत. हे कोट्स आणि संबंधित पोस्ट आणि प्रतिमा बनावट आणि खोट्या आहेत. जानेवारी २०२४ पर्यंत, द न्यू यॉर्क टाईम्सचे कार्यकारी संपादक जोसेफ कान आहेत. द टाइम्समध्ये जोसेफ होप नावाचा दुसरा कोणताही वर्तमान किंवा माजी संपादक नाही.” असे न्यूयॉर्क टाइम्सने स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर लिहिलेला लेख असे सांगत व्हायरल दीर्घ टेक्स्ट मेसेज खोटा असल्याचे आणि तो लिहिल्याचा दाव्याचे न्यूयॉर्क टाइम्सने खंडन केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search
Website of New York Times
Article published by New York Times Company on February 6, 2024
Runjay Kumar
June 5, 2025
Prasad S Prabhu
June 4, 2025
Komal Singh
June 4, 2025