Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
गुजरात निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल आपली सर्व ताकद पणाला लावत आहेत. काल, 12 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी अहमदाबादच्या एका ऑटो चालकाचं आमंत्रण स्वीकारलं आणि रात्री त्याच्या घरी जेवण केलं.
आता हे पाहता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केजरीवाल एका घरात काही लोकांसोबत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की घराच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र आहे. हा फोटो याच ऑटोचालकाच्या घरी असल्याचा दावा केला जात आहे.
वक्फ विकास समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते वसीम आर खान यांनी हा फोटो ट्विट करत लिहिले की, केजरीवाल ज्या लोकांच्या घरी गेले ते लोक पंतप्रधान मोदी यांचे चाहते आहेत. हा दावा करत हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल फोटोला रिव्हर्स सर्च केल्यावर आम्हाला अरविंद केजरीवाल यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी केलेले एक ट्विट सापडले. केजरीवाल यांनी अहमदाबादच्या याच ऑटो ड्रायव्हरबद्दल ट्विट केलं होतं, ज्याच्या घरी ते जेवायला गेले होते. त्यांच्या ट्विटमध्ये एक व्हायरल फोटो देखील आहे, मात्र यामध्ये पंतप्रधान मोदींचा नाही तर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो भिंतीवर लटकलेला दिसत आहे.
याशिवाय झी दिल्ली-एनसीआर हरियाणाने देखील ऑटो चालकाच्या घरी या जेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच घराच्या भिंतीवर पंतप्रधानांचं चित्र दिसत नसल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजेच व्हायरल झालेला फोटो फेक आहे.
अरविंद केजरीवाल ज्या अहमदाबादच्या घरी जेवायला गेले होते, त्या रिक्षाचालकाकडे पंतप्रधान मोदींचा फोटो नव्हता, हे येथील आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने हे चित्र एडिट करून भिंतीवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला आहे.
Our Sources
Tweet of Arvind Kejriwal, posted on September 12, 2022
Tweet of Zee Delhi-NCR Haryana, posted on September 13, 2022
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Runjay Kumar
February 11, 2025
Prasad S Prabhu
April 6, 2024
Komal Singh
April 3, 2024