Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मतदानादरम्यान मुस्लिम मतदारांना विशेष सुविधा देण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
Fact
व्हायरल पत्र बनावट आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेले एक कथित पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की त्यांनी निवडणूक आयोगाला मतदानादरम्यान मुस्लिम मतदारांसाठी विशेष सुविधांची मागणी केली होती.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल पत्र बनावट आहे आणि आम आदमी पक्षानेही ते बनावट असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल झालेले कथित पत्र अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाच्या बीसी पात्रा यांना लिहिले आहे आणि पत्राच्या तळाशी त्यांची स्वाक्षरी देखील आहे. इंग्रजीत असलेल्या या पत्रात असे लिहिले आहे की, “नवी दिल्ली मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात मी हे पत्र एका महत्त्वाच्या विनंतीसाठी लिहित आहे. तुम्हाला आणि निवडणूक आयोगाला माहिती आहे की, नवी दिल्लीत अल्पसंख्याक मतदारांची, विशेषतः मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की मुस्लिम मोठ्या संख्येने मतदान करतात परंतु तरीही हिंदू आणि इतर धार्मिक गटांकडून त्यांच्याशी भेदभाव केला जातो. वाल्मिकी आणि दलित गुंडांनी मुस्लिमांना मारहाण आणि हल्ला केल्याचीही प्रकरणे आहेत.
पत्रात पुढे म्हटले आहे की, “म्हणून, भारतीय प्रजासत्ताकाच्या या ७६ व्या वर्षात, मी निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्यांनी उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांसाठी खालील व्यवस्था करावी: १. घरापासून मतदान केंद्रापर्यंत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून द्यावी. २. विलंब टाळण्यासाठी मुस्लिम मतदारांची ओळखपत्र तपासणी करू नये. ३. फक्त मुस्लिमांसाठी मतदानाची वेळ संध्याकाळी ५ वरून रात्री ८ वाजेपर्यंत वाढवावी.”
हे पत्र X वर व्हायरल कॅप्शनसह शेअर करण्यात आले आहे.
युजर्सनी आमच्या व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर समान दावा शेयर करीत सत्यता तपासण्याची विनंती केली आहे.
Newschecker ने प्रथम संबंधित कीवर्ड वापरून गुगलवर सर्च केले आणि आम्हाला व्हायरल पत्राचा उल्लेख असलेला कोणताही न्यूज रिपोर्ट आढळला नाही. जर असे वादग्रस्त पत्र दिल्ली विधानसभा निवडणुकीशी संबंधित असते तर माध्यमांमध्ये निश्चितच त्याची बातमी आली असती.
यानंतर, जेव्हा आम्ही अरविंद केजरीवाल यांचे एक्स अकाउंट शोधले तेव्हा आम्हाला निश्चितच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या लोकांना लिहिलेली पत्रे आढळली, ज्यात पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोग यांचा समावेश होता. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आयोगाकडून मिळालेल्या नोटीसला उत्तर दिले होते, परंतु यामध्ये त्यांनी मुस्लिम समुदायासाठी विशेष सुविधांची मागणी केलेली नाही.
आमच्या तपासादरम्यान, आम्ही आम आदमी पक्षाचे फेसबुक अकाउंट शोधले आणि आम्हाला १९ जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेले एक पत्र सापडले. जेव्हा आम्ही या पत्राची तुलना व्हायरल पत्राशी केली तेव्हा आम्हाला आढळले की दोन्ही पत्रांमध्ये NCO/25/10 हाच पत्र क्रमांक नमूद करण्यात आला होता.
तथापि, मूळ पत्रात, अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे स्वच्छता कामगारांसाठी सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आणि दिल्ली सरकार या जमिनींवर कामगारांसाठी घरे बांधेल असेही म्हटले होते.
आम आदमी पक्षाच्या एक्स अकाउंटवरून १९ जानेवारी २०२५ रोजी पोस्ट केलेले हे पत्र आम्हाला आढळले. हे पत्र पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अरविंद केजरीवाल यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. दिल्ली सरकार या जमिनीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधणार आहे. यामध्ये, सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली जातील”.
आमच्या चौकशीत आम्ही आम आदमी पक्षाशीही संपर्क साधला, त्यांनी व्हायरल पत्र नाकारले आणि ते बनावट असल्याचे सांगितले. पक्षाचे म्हणणे आहे की, असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की व्हायरल पत्र बनावट आहे आणि अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला असे कोणतेही पत्र लिहिले नाही.
Our Sources
A letter posted by AAP FB account on 19th Jan 2025
A letter posted by AAP X account on 19th Jan 2025
Telephonic Conversation with AAP
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
March 21, 2025
Vasudha Beri
March 21, 2025
Prasad S Prabhu
March 19, 2025