Authors
एप्रिल फुलच्या दिवसाने सुरु होणाऱ्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियावर अनेक फेक दावे पाहायला मिळाले. आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना अरविंद केजरीवाल 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते, असा दावा करण्यात आला. शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपचे प्रचारक बनत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा, असे सांगत आहेत. असा दावा करण्यात आला. जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने पुण्यात जारी केलं आहे, असा दावा करण्यात आला. उत्तर प्रदेशात जनतेने भाजपच्या लोकांचा पाठलाग करून मारहाण केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते?
आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना अरविंद केजरीवाल 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे उद्धव ठाकरे सध्या म्हणाले नाहीत
शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपचे प्रचारक बनत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा, असे सांगत आहेत. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
पुण्यात जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने जारी केलं?
जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने पुण्यात जारी केलं आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
उत्तरप्रदेशात भाजपवाल्यांना पाठलाग करून मारले?
उत्तर प्रदेशात जनतेने भाजपच्या लोकांचा पाठलाग करून मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा