Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम...

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
ही अश्लील छायाचित्रे राम मंदिराचे पुजारी म्हणून निवडल्या गेलेल्या मोहित पांडे यांची आहेत.
Fact
या चित्रात ना मोहित पांडे उपस्थित आहे ना त्याला राम मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अलीकडेच, अनेक माध्यमांनी अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिराबाबत दावा केला होता की, मोहित पांडे नावाच्या व्यक्तीला राम मंदिराचा मुख्य पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये कपाळावर तिलक आणि चंदन लावलेला एक पुरुष एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या मोहित पांडे यांचे हे छायाचित्र असल्याचा दावा करत हे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे असल्याचा दावा केला जात आहे.

तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल होत असलेले दोन्ही दावे दिशाभूल करणारे आहेत. अयोध्येतील राम मंदिरासाठी मुख्य पुजारी किंवा पुजारी म्हणून कोणत्याही व्यक्तीची निवड करण्यात आलेली नाही. रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यानेही याला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी, आमच्या तपासात आम्हाला असेही आढळले की व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह छायाचित्रात मोहित पांडे उपस्थित नाही.

टीप: व्हायरल झालेले चित्र अत्यंत आक्षेपार्ह असल्याने, आम्ही त्याबद्दल कोणताही तपशील येथे देत नाही किंवा अशी कोणतीही फेसबुक पोस्ट किंवा ट्विट जोडत नाही.

मोहित पांडे यांना राम मंदिराचे मुख्य पुजारी बनवण्याचा व्हायरल दावा इंडिया टीव्हीने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केला आहे. त्याचवेळी एबीपी न्यूजने आपल्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केलेल्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये हा व्हायरल दावा केला आहे.

व्हायरल आक्षेपार्ह चित्र गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटी शेड्यूल्ड फ्रंटचे अध्यक्ष हितेंद्र पिथाडिया आणि इतर अनेक व्हेरिफाइड एक्स हँडल्सने व्हायरल दाव्यासह शेअर केले होते. मात्र, नंतर बहुतेकांनी हे ट्विट डिलीट केले.

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही
Courtesy: X/Virus_Studioz

आम्हाला मराठी भाषेतही हा दावा करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही
Courtesy: Facebook/ Premkumar Sartape

या फेसबुक पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check/Verification

Newschecker ने सर्वप्रथम मोहित पांडे यांची राम मंदिराचे मुख्य पुजारी किंवा पुजारी म्हणून नियुक्ती केल्याच्या व्हायरल दाव्याची चौकशी केली.

जेव्हा आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने बातम्यांचे रिपोर्ट शोधले तेव्हा आम्हाला 6 डिसेंबर 2023 रोजी एबीपी न्यूजच्या वेबसाइटवर आईएएनएस या वृत्तसंस्थेचा हवाला देऊन प्रकाशित झालेला रिपोर्ट आढळला.

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही
Courtesy: ABP LIVE

या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रामजन्मभूमी ट्रस्टने नुकतेच अर्चक (पुजारी) पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी सुमारे 3000 जणांनी अर्ज केले होते, त्यापैकी सुमारे 200 उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली होती. मुलाखतीनंतर सुमारे 20 अर्जदारांची अर्चकांच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. आता या अर्जदारांमधून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांची अर्चक पदासाठी निवड केली जाईल. त्यात ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांची प्रतिक्रिया देखील आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की “जे उमेदवार प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करतील त्यांना पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल.”

तपासादरम्यान, आम्हाला 12 डिसेंबर 2023 रोजी ETV च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील आढळला. यात रामजन्मभूमी ट्रस्टचा हवाला देत, मोहित पांडे नावाच्या व्यक्तीची राम मंदिराचे पुजारी किंवा मुख्य पुजारी म्हणून निवड झाल्याच्या व्हायरल दाव्याचे खंडन करण्यात आले आहे.

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही
Courtesy: ETV Bharat

या रिपोर्टमध्ये श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांचे विधान आहे. प्रकाश गुप्ता म्हणाले की, ‘मोहित पांडे नावाच्या व्यक्तीला पुजारी बनवल्याचा दावा चुकीचा आहे. अद्याप एकही पुजारी नेमलेला नाही. मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते आणि सुमारे 3000 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 300 जणांच्या मुलाखती घेऊन सुमारे 21 जणांची निवड करण्यात आली. या निवडलेल्यांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर परीक्षाही घेतली जाणार असून चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच मंदिराच्या अर्चक पदावर नियुक्त केले जाईल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांमध्ये मोहित पांडेच्या नावाचाही समावेश असल्याची माहितीही प्रकाश गुप्ता यांनी दिली.

आमच्या तपासात, आम्ही जिथून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य विमलेंद्र मोहन मिश्रा आणि मोहित पांडे यांनी शिक्षण घेतले होते त्या गाझियाबादमधील वेद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशीही संपर्क साधला.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य विमलेंद्र मोहन मिश्रा यांनी आम्हाला सांगितले की, “आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीची राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून निवड झालेली नाही. श्री सत्येंद्र महाराज सध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. नुकतेच ट्रस्टकडून पुजारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे 3000 अर्जदारांपैकी 300 जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. यातील काही जणांची मुलाखतीनंतर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडक लोकांमधूनच पुढील पुजारी नेमले जातील.”

त्याचवेळी, दुधेश्वर नाथ, गाझियाबाद येथील वेद विद्यालयाचे प्राचार्य त्वाराज यांनीही आम्हाला सांगितले की मोहित पांडेची प्रशिक्षणासाठी नुकतीच निवड झाली आहे. प्रशिक्षणानंतरच पुजार्‍याची भूमिका कोण साकारणार हे ठरेल. यावेळी त्यांनी असेही सांगितले की मोहित पांडेने 7 वर्षे त्यांच्या शाळेतून वेद आणि विधींचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते तिरुपतीला गेले. तिरुपती येथे शिकत असताना त्यांनी पुजारी पदासाठी अर्ज केला होता आणि त्यांच्या पात्रतेमुळे त्यांची पुरोहित प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

मोहित पांडे यांची राम मंदिराचे पुजारी किंवा मुख्य पुजारी म्हणून निवड झाल्याचा व्हायरल दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात मिळालेल्या वरील पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

यानंतर, आम्ही व्हायरल आक्षेपार्ह चित्राची देखील तपासणी केली आणि अनेक पॉर्न वेबसाइट्सवर उक्त दृश्य असलेले व्हिडिओ आढळले. या वेबसाइट्सवर त्या व्यक्तीचे वर्णन तेलुगू पुजारी असे करण्यात आले होते. तथापि, आम्ही या दाव्याची पुष्टी करत नाही. (टीप: आम्हाला खेद आहे की सदर वेबसाईटवर अश्लील साहित्य असल्याने त्या वेबसाइट्सचा येथे उल्लेख करू शकलो नाही.)

आता आम्ही व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीचा चेहरा मोहित पांडेच्या खऱ्या फोटोशी जुळवला. परंतु आम्हाला कोणतेही लक्षणीय साम्य दिसले नाही.

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही

यावेळी, अशा अनेक वेबसाइट्सचीही मदत घेण्यात आली, जी दोन छायाचित्रांमध्ये दर्शविलेल्या चेहऱ्यांमध्ये किती टक्के साम्य आहे हे दर्शविते. परंतु यापैकी एकाही वेबसाइटने दोन्ही चेहरे एकाच व्यक्तीचे आहेत असे दर्शविले नाही.

एवढेच नाही तर मोहित पांडेच्या विद्यालयाचे प्राचार्य त्वाराज यांनीही व्हायरल झालेल्या दाव्याचे खंडन केले आणि सांगितले की, मोहित या आक्षेपार्ह छायाचित्रात उपस्थित नाही. त्यामुळे व्हायरल झालेले आक्षेपार्ह दृश्य मोहित पांडेचे नसल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल होत असलेले दोन्ही दावे दिशाभूल करणारे आहेत. अयोध्येतील राम मंदिरासाठी मुख्य पुजारी किंवा पुजारी म्हणून कोणत्याही व्यक्तीची निवड करण्यात आलेली नाही आणि व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह छायाचित्रात मोहित पांडेही उपस्थित नाही.

Result: False

Our Sources
Article Published by ABP News on 6th Dec 2023
Article Published by ETV Bharat on 12th Dec 2023
Telephonic Conversation with Vimlendra mohan pratap mishra, Member Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra
Telephonic conversation with Dudheshwar Nath Ved Vidyalay Prinicpal Twaraj


(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular