Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: मुंबईच्या भेंडी बाजारात 'भारत माता कि जय' म्हटले म्हणून झाली...

Fact Check: मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून झाली मारहाण? जुन्या घटनेचा व्हिडीओ खोटा दावा करून व्हायरल

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली.

Fact
व्हायरल व्हिडीओ राजस्थान येथील भिलवाडा येथे घडलेल्या २०१९ मधील एका घटनेचा आहे. ही घटना मुंबईत घडलेली नसून कोणताही सांप्रदायिक अँगल नाही.

मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली. असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. भारत मातेचा जय करणाऱ्यांची अशी अवस्था केली जात आहे. जास्तीत जास्त शेयर करा असे हा दावा सांगतो.

Fact Check: मुंबईच्या भेंडी बाजारात 'भारत माता कि जय' म्हटले म्हणून झाली मारहाण? जुन्या घटनेचा व्हिडीओ खोटा दावा करून व्हायरल
Courtesy: Twitter@Pradeep16277776

संपूर्ण हिंदी भाषेत असलेले असे समान दावे आम्हाला मिळाले.

दाव्यातील मुख्य गाभा हाच आहे की, ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून मारहाण करण्यात आली. दरम्यान काही दाव्यात मुस्लिम जिहादींनी मारहाण केली असे म्हटलेले आहे, तर काही दाव्यात एका सरदारजीला असे मारण्यात आले असून हा इस्लामिक देश आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Fact Check/ Verification

Newschecker ने व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या व्हिडिओची बारकाईने पाहणी केली. व्हिडिओमध्ये ‘भारत माता कि जय’ असा नारा दिलेला ऐकावयास येतो. यानंतर एका वृद्ध व्यक्तीस जमाव मारहाण करू लागतो. हा व्हिडीओ आणि त्याची कॅप्शन बघता, व्हायरल पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी खऱ्या असतील असाच संशय निर्माण होतो. यामुळे आम्ही याचा मुळापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला.

आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स घेऊन त्यावर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला यावरून या व्हिडिओचा मुख्य स्रोत सापडला. भाजप नेते मजिंदर सिंग सिरसा यांनी १९ ऑक्टोबर २०१९ रोजी हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: मुंबईच्या भेंडी बाजारात 'भारत माता कि जय' म्हटले म्हणून झाली मारहाण? जुन्या घटनेचा व्हिडीओ खोटा दावा करून व्हायरल
Courtesy: Facebook/ Majinder Singh Sirsa

सदर व्यक्तीने प्रोफाइल वर आपली ओळख भाजपचे राष्ट्रीय सचिव (National Secretary) अशी नोंदवली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, “राजस्थान के आजाद चौक मार्केट भीलवाड़ा में एक बुजुर्ग के साथ हुई बर्बरता से मारपीट! बहुत ही घटिया मानसिकता होती है उन लोगों की जो बुजुर्गों और निहत्थों के छोटी सी बात को लेकर मारपीट पर उतर आते हैं, मेरी राजस्थान पुलिस और राजस्थान के मुख्यमंत्री जी से विनती – वीडियो में मारपीट कर रहे नौजवानों के ख़िलाफ़ तुरंत मुक़दमा दर्ज हो और इन्हें अरेस्ट किया जाए”

या कॅप्शन वरून व्हायरल व्हिडीओ २०१९ पासून इंटरनेटवर असल्याचे आणि ती राजस्थानच्या भिलवाडा येथील आझाद चौक मार्केट येथे घडल्याचे आमच्या लक्षात आले. एका वयोवृद्धाला छोट्या कारणावरून मारहाण झाली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचेही आमच्या निदर्शनास आले.

हाच सुगावा घेऊन शोध करतानाच @mssirsa या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट वरून मजिंदर सिंग सिरसा यांनीच घटनेसंदर्भात झालेल्या पोलीस कारवाईची माहिती दिली आहे.

या ट्विट वरून आम्हाला माहिती मिळाली की मानसिक स्थिती ठीक नसलेल्या होतचंद सिंधी या ५५ वर्षीय व्यक्तीस १५ ऑक्टोबर २०१९ रोजी ही मारहाण भिलवाडा येथील आझाद चौक येथे ही मारहाण झाली होती. दररोज रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांची छेद काढल्यामुळे चिडून जाऊन ही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या ५ जणांवर फिर्याद दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. होतचंद याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्याच्या मानसिक स्थिती संदर्भात तपास करण्यात आला. विशेषतः मारहाण करणाऱ्यांमध्ये मनोज, हेमू व भगवान हे तिघे हिंदू तर इरफान आणि मंजूर हे दोघे मुस्लिम होते. यावरून मानसिक स्थिती बिघडलेल्या व्यक्तीस ही मारहाण झाली असून त्यात कोणताही सांप्रदायिक अँगल नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आणखी शोध घेताना आम्हाला @sameerkhan_1212 नामक X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट वरून १९ ऑक्टोबर २०१९ रोजी केली गेलेली एक पोस्ट आढळली. सदर मारहाणी नंतर रस्त्यावर पडलेल्या त्याच व्यक्तीचे व्हिज्युअल्स यामध्ये पाहता येतील. त्यामध्येही हा व्हिडीओ भिलवाडा येथील असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

यासंदर्भात आम्हाला कोणतेही स्वतंत्र मीडिया रिपोर्ट्स आढळले नाहीत. यामुळे आम्ही भिलवाडा पोलीस स्थानकाशी संपर्क केला. आम्हाला तेथील एस एच ओ यांनी सांगितले की “ही घटना १५ ऑक्टोबर २०१९ रोजी भिलवाडा येथील आझाद चौकात घडली. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव होतचंद सिंधी होते. त्यांचा मुलगा सोनू जेठानी यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी हेमू सिंधी, इलू सिंधी, भगवान सिंधी उर्फ मनोज, मंजूर शेख, आसिफ शेख, शेयब शेख, पोला शेख आदींना अटक केली होती.”

पोलिसांनी माहिती दिली की, “होतचंद यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. घटनास्थळी ते इतर फेरीवाल्यांना शिवीगाळ करत होते. या फेरीवाल्यांशी त्यांचा जुना वाद होता. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता होतचंद यांनी फेरीवाल्यांशी वाद घातला. यातूनच पाच-सहा फेरीवाल्यांनी त्यांना मारहाण केली होती. सध्या होतचंद हयात नाहीत.”

Conclusion

यावरून आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली. असा दावा खोटा आणि जुन्या घटनेतील व्हिडीओ वापरून करण्यात आला आहे. त्या घटनेतही मानसिक स्थिती ठीक नसलेल्या व्यक्तीने वाद घातल्याने मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थान येथील भिलवाडा येथे २०१९ मध्ये घडलेल्या या घटनेशी कोणताही सांप्रदायिक अँगल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Facebook post by Majinder Singh Sirsa on October 19, 2019
Tweet by Majinder Singh Sirsa on October 21, 2019
Tweet by SAM on October 19, 2019
Conversation with SHO Bhilawada Police Station


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular