Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeFact Checkयुकेमधील हायब्रीड इलेक्ट्रिक बसचा फोटो बेस्टची सुधारित डबल डेकर बस म्हणून शेअर

युकेमधील हायब्रीड इलेक्ट्रिक बसचा फोटो बेस्टची सुधारित डबल डेकर बस म्हणून शेअर

Authors

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटो ट्विट करत मुंबईची आयकॉनिक डबल डेकर बस इलेक्ट्रिकवर चालणार असल्याची घोषणा केली आहे. 

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) मुंबईसाठी 900 AC इलेक्ट्रिक डबल-डेकर बस खरेदी करत आहे. या बस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि उत्सर्जनमुक्त असतील.

महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असलेले ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या प्रतिष्ठित डबलडेकर बसेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा वैयक्तिकरित्या रस आहे.

बेस्टचा लोगो असलेल्या डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटो फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले, “बेस्ट डबल डेकर, आता इलेक्ट्रिक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी वैयक्तिकरित्या मुंबईच्या आयकॉनिक डबल डेकर बसेसचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक आहोत. असे करत असताना, बेस्ट त्यापैकी 900 खरेदी करणे, पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि उत्सर्जन-मुक्त. आम्ही आमची बेस्ट फ्लीट वाढवतो, शेवटी 10,000 इलेक्ट्रिक/स्वच्छ पर्यायी इंधन बसेस, आमचे उद्दिष्ट जास्तीत जास्त डबल-डेकर बस असणे हे आहे, कारण यामुळे आमची क्षमता वाढते.”

डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटो हा दावा फेसबुकवर देखील व्हायरल झाला

इलेक्ट्रिक बसचा फोटो
फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

फेसबुक पोस्ट इथे पहा.

लोकसत्ताच्या बातमीत देखील हा फोटो वापरण्यात आला आहे.

लोकसत्ताच्या बातमीचा स्क्रीनशाॅट

Fact Check/Verification

आम्ही व्हायरल डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटो फोटो गुगल इमेज रिव्हर्स द्वारे सर्च केला असता 1 नोव्हेंबर 2016 रोजी प्रकाशित व्होल्वो बसेसच्या प्रेस रिलीजमध्ये तो आढळून आला. चित्रासह कॅप्शन असे लिहिले आहे, “युरोमध्ये प्रीमियर झालेल्या व्होल्वो बसमधील नवीन B5LHC डबल डेक इलेक्ट्रिक हायब्रिड बर्मिंगहॅममध्ये बस एक्स्पो 2016 शो.”

volvo च्या प्रेस रिलीजचा स्क्रिनशाॅट

व्हाल्वोच्या बसच्या डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटोत बेस्टचा लोगो आढळून आला नाही. दोन्ही फोटोची तुलना खाली पाहू शकता.

बेस्टच्या नवीन डबल डेकर इलेक्ट्रीक तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही बेस्टचे डेप्युटी पीआरओ एमएस वराडे यांच्याशी संपर्क साधला. वराडे म्हणाले की या बसेस कॉसिस ई-मोबिल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्ह लिमिटेड बनवतील. मात्र त्यांचे फोटो किंवा इतर तपशील आम्हाला अजून मिळालेले नाही. शिवाय सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटो देखील बेस्टने प्रसारित केलेला नाही. जेव्हा नवीन इलेक्ट्रीक डबल डेकर बसचा फोटो व तपशील आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही माध्यमांशाशी शेअर करु.

Times Now Marathi च्या वृत्तानुसार, बेस्ट समितीने मंगळवारी 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बससाठी 12 वर्षांचा करार मंजूर केला. या प्रकल्पासाठी एकूण 3600 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या राज्य सरकारने यासाठी ९९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत हा निधी देण्यात आला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, “या वर्षी 225 डबलडेकर बसेसची पहिली तुकडी येण्याची अपेक्षा आहे तर दुसरी तुकडी 225 बसेससह पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय उर्वरित 450 बसेस जून 2023 पर्यंत पोहोचवल्या जातील. 

Read More : भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन, भाजपाची महाराष्ट्रात दुटप्पी भुमिका?

Conclusion 

आमच्या पडताळणीत आढळले की, व्हायरल डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा फोटो हा युकेमधील हायब्रीड बसचा आहे. बेस्टने अजून तरी कोणताही फोटो अधिकृतरित्या रिलीज केलेला नाही.

Result: Manipulated Media

Sources

Volvo buses

Direct Contact


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular