Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
आदित्य ठाकरेसोबतची युवती रिया चक्रवर्ती आहे. याच कारणामुळे महाराष्ट्र सरकार सुशांतची केस सीबीआयला देत नाही. दाल में जरुर कुछ तो काला है. अशा आशयाची पोस्ट आदित्य ठाकरे एका युवतीसोबत कारमध्ये बसल्याचा फोटोसह व्हायरल होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशातच हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Fact Check/Verification
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियात खूप चर्चा रंगली। कुणी ही आत्महत्या आहे असे म्हणत आहेत कुणाली ही हत्या वाटते. अशातच सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरुद्ध बिहार पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध मनी लाॅड्रिंगसहित इतर गुन्हे दाखल केले आहेत. एकीकडे बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे तर महाराष्ट्र पोलिस बिहार पोलिसांना या प्रकरणात मदत करत नसल्याचा आरोप होत आहे. आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील मैत्रीमुळेच मुंबई पोलिस तपासात मदत करत तर नाही ना अशा आशय असलेल्या काही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यात आदित्य ठाकरे यांचा एका युवतीसोबतचा फोटो व्हायरल होत असून ती युवती रिया चक्रवर्ती असल्याचा दावा केला जात आहे. आम्ही याविषयी पडताळणी सुुरु केली. रिव्हर्स इमेजच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला. या शोधादरम्यान अनेक मीडिया रिपोर्ट्स वरुन हे सत्य समोर आले की आदित्य ठाकरे यांच्यासोबत कारमध्ये बसलेली युवती रिया चक्रवर्ती नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोटो एका वर्षापूर्वीचा मार्च 2019 मधील आहे. आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पाटणी बांद्र्यातील एका रेस्टाॅरंटमध्ये लंचसाठी गेले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे मंत्री नव्हते. आदित्य 2019 मध्ये मंत्री झाले. India TV सह देशातील अनेक प्रतिष्ठित माध्यमांनी हा फोटो त्यावेळी प्रसिद्ध केला होता. व्हायरल फोटोसंदर्भातील प्रसिद्ध झालेले मीडिया रिपोर्ट्स येथे पाहू शकता.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, आदित्य ठाकरे यांच्यासोबत कारमध्ये बसलेली युवती रिया चक्रवर्ती नाही तर अभिनेत्री दिशा पाटणी आहे. आदित्य ठाकरे मंत्री नव्हते तेव्हाचा हा फोटो आहे.
Result- False
Sources:
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.