मुंबईत बेस्ट ने इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरु केलेली असल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक लाल रंगाची कार असून कारच्या बाजुला खाकी गणवेश परिधान केलेला व्यक्ती ही उभा आहे. तसेच कार वर बेस्टचा लोगो लावलेला असून ड्रायव्हरच्या दरवाजावर BEST ELECTRICK TAXI असे लिहिले आहे.
हाच दावा करणा-या अनेक पोस्ट देखील आम्हाला फेसबुक आणि ट्विटरवर आढळून आल्या ज्यात म्हटले आहे की, बेस्ट ने इलेक्ट्रीक टॅक्सी सेवा सुरु केली असून 4.50 रुपये प्रतिकिलोमीटर एवढ्या माफक ही सेवा सुरु करण्यात आली आहे.



युट्यूबवर देखील ही बातमी व्हायरल झाली आहे. CHAND PATHAN या चॅनलवर हा व्हायरल फोटो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 9,371 व्यूव्ज मिळाल्या आहेत.

Fact Check/Verification
बेस्टने मुंबईत इलेक्ट्रिक टॅक्सी सुरु केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता मात्र एवढी मोठी बातमी आम्हाला कोणत्याही इलेक्ट्राॅनिक माध्यमांत आढळून आली नाही. त्यामुळे सत्यता जाणून घेण्यासाठी बेस्टच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला असता आम्हाला सांगण्यात आले की सोशल मीडियात व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.
याशिवाय आम्हाला बेस्ट कडून व्हायरल दाव्याबाबत स्पष्टीकरण दिल्याची बातमी दैनिक पुढारीत 27/08/21 रोजी प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले. या बातमीत म्हटले आहे की, मुंबईकरांच्या सेवेत इलेक्ट्रिक बस आल्यानंतर इलेक्ट्रीक टॅक्सी येणार असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बेस्टची इलेक्ट्रिक टॅक्सी सुरु होणार असल्याची चर्चा रंगली.परतुं बेस्ट उपक्रमाने याबाबत खुलासा करुन ही अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारची कोणतीही इलेक्ट्रिक टॅक्सी बेस्ट बेस्ट उपक्रम सुरु करणार नसल्याने मुंबईकरांनी कोणत्याही अफवेला बळी पडून नये असे आवाहन केले आहे.

याशिवाय आम्हाला बेस्टच्या ट्विटर हॅंडलवर देखील इलेक्ट्रिक टॅक्सी सेवेची पोस्ट खोटी असल्याची माहिती देणारे प्रसिद्ध पत्रक शेअर करण्यात आल्याचे आढळून आले.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, बेस्टकडून इलेक्ट्रीक टॅक्सी सेवा सुरु केली जाणार असल्याची अफवा आहे. सोशल मीडियावर फोटोशाॅप्ड इमेज व्हायरल झाली आहे.
Result- False
Our Source
BEST- https://twitter.com/myBESTBus/status/1430866766184415233
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा