Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली.
Fact
हा दावा खोटा आहे. भाजपच्या किटमध्ये परफ्यूमच्या प्लास्टिक बॉटल होत्या असे तपासात स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. घाटकोपर 170 मतदार संघात बूथ मटेरियल मध्ये सोन्याची बिस्कीट सापडले. असे हा दावा सांगतो.

दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही संबंधित व्हायरल व्हिडीओ बारकाईने बघितला. दरम्यान व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही Google वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. मात्र व्हिडिओचा मूळ स्रोत किंवा त्याची अधिकृत सूत्राद्वारे असलेली माहिती उपलब्ध झाली नाही.
दरम्यान आम्ही संबंधित किवर्डसच्या माध्यमातून Google वर शोधले. आम्हाला यासंदर्भात काही न्यूज रिपोर्ट्स मिळाले. ते इथे, इथे आणि इथे वाचता येतील.
त्यापैकी पहिला रिपोर्ट होता NDTV चा. ११ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या या रिपोर्टमध्ये या घटनेसंदर्भात भाजपचे मुंबई नॉर्थ सेंट्रल जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांनी दिलेली माहिती आहे. त्यांनी घटनेसंदर्भात स्पष्टीकरण देताना आपल्याला संबंधित पथकाने अडवून कसा त्रास दिला, सोन्याच्या बिस्किटासाठी कसा तपास झाला आणि शेवटी परफ्युमची प्लॅस्टिकची बाटली कशी सापडली, याची माहिती दिली. संबंधित रिपोर्टमध्ये याबाबतचा व्हिडीओ रिपोर्टसुद्धा आम्हाला पाहायला मिळाला.

आणखी तपास करताना आम्हाला, lokmat.com ने ११ मे २०२४ रोजी याच संदर्भात प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. “घाटकोपरमध्ये सोन्याच्या बिस्किटांची अफवाच निघाली आणि प्रचाराचे साहित्य सापडले.” असे या बातमीत म्हटले आहे. या बातमीत मुंबईचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी तपासाअंती सोन्याची बिस्किटे नव्हे तर प्रचाराचे साहित्य मिळाल्याचे म्हटले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आणखी तपास करताना आम्हाला mumbaipress.com ने ११ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. तेथेही पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांचा हवाला देऊन तपासादरम्यान सोन्याची बिस्किटे आहेत असे आवाज ऐकायला आले असले तरी अखेरीस प्रचाराचे साहित्य सापडल्याचेच म्हटले आहे.

गाडीत सोन्याची बिस्किटे असल्याच्या संशयावरून भाजपचे मुंबई नॉर्थ सेंट्रल जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांना पोलीस स्थानकात नेऊन तपास करण्यात आला. आणि एकंदर प्रकार घडल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले. दरम्यान आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी बोलताना,” दिनांक ९ मे रोजी कुटुंबासमवेत जात असताना आपल्याला संशयाने अडवून घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस स्थानकात नेण्यात आले. आपल्याला बराच काळ थांबवून ठेवण्यात आले. मात्र आपल्या गाडीत प्रचाराचे साहित्य असल्याचे आणि सोन्याचे बिस्कीट ही अफवा असल्याचे स्पष्ट होताच सोडून देण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत आपल्याला आणि कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांनीही चुकीची अफवा पसरविणे सुरूच ठेवले आहे.” अशी माहिती दिली.
दरम्यान आम्ही चिरागनगर पोलीस स्थानकाशीही संपर्क साधला. “सोन्याची बिस्किटे सापडल्याची कोणतीही फिर्याद नोंद झालेली नाही. त्यादिवशीचा प्रकार हा निवडणूक पथकाचा नियमित तपासाचा भाग होता. त्यात सोन्याची बिस्किटे सापडली नाहीत.” असे सांगण्यात आले.
अशाप्रकारे आमच्या तपासात भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली हा दावा खोटा आहे. हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मुंबईच्या घाटकोपर भागात संशयावरून तपासणी करण्यात आलेल्या भाजपच्या किटमध्ये प्रचाराचे साहित्य आणि परफ्यूमच्या प्लास्टिक बॉटल होत्या असे तपासात उघड झाले आहे.
Our Sources
News published by NDTV on May 11, 2024
News published by Lokmat on May 11, 2024
News published by Mumbai Press on May 11, 2024
Conversation with Ajay Badgujar, District Vice President, BJP Mumbai North Central
Conversation with Chirag Nagar Police station, Ghatkoper, Mumbai
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
December 2, 2025
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025