इराणी गॅंगपासून (Iranian gangs) सावध राहण्याचा संदेश लाखनी पोलिसांनी असल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. यात अनेक आरोपींचे फोटो छापले असून ही गॅंग चादर विकण्याच्या बहाण्याने लुटमार करते त्यामुळे यांच्यापासून सावध रहा असे या संदेशात म्हटले आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
हे सर्व बेडशीट व वस्तु विकायला येतात. याच्यापासून सावध रहा. गावातील सर्व ग्रुपवर पाठवा. हे दरोडेखोर आहेत. सावधान. सौजन्य लोणी पोलिस स्टेशन. सावधान चेहरा लक्षात येताच 07186245632 पोलिस स्टेशन लाखनी
असे या संदेशात म्हटले आहे. आमच्या एका वाचकाने व्हाट्सअॅपवर व्हायरल होत असलेली ही पोस्ट आमच्या निदर्शनास आणून दिली व इराणी गॅंगपासून(Iranian gangs) सावध राहण्याचा संदेश लाखनी पोलिसांनी दिला आहे की नाही याची सत्यता पडताळण्यास सांगितली.

ही पोस्ट फेसबुवर देखील अनेक महिन्यापांसून शेअर होत असल्याचे आम्हाला आढळून आले. यात देखील इराणी गॅंगपासून सावध राहण्याचा संदेश लाखनी पोलिसांनी दिला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fact Check/Verification
इराणी गॅंगपासून (Iranian gangs) सावध राहण्याचा संदेश लाखनी पोलिसांनी खरंच दिला आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही पोस्टमध्ये दिलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिस स्टेशनच्या फोन नंबरवर संपर्क साधला असता पोलिस इन्स्पेक्टर मनोज वाडिवे यांनी सांगितले की, लाखनी पोलिसांनी अशी कोणतीही पोस्ट जारी केलेली नाही. सदर पोस्ट खोटी आहे.
यानंतर आम्ही व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील फोटो रिव्हर्स इमेज सर्चच्या साहाय्याने शोधला असता daijiworld.com या वेबसाईटवरील 29 जुलै2019 रोजीच्या एका बातमीत हा फोटो आढळून आला. या बातमीत म्हटले आहे की, ही मंगळूरच्या बाजपेयी पोलिसांनी जारी केलेली यादी आहे. अहवालानुसार, “ही टोळी कर्नाटकातील चिक्कमंगलुरू शहर आणि त्या जिल्ह्याच्या इतर भागात आधीच सक्रिय आहे. या टोळीचे सदस्य दिवसभरात ब्लँकेट विक्रेते म्हणून लोकांशी संपर्क साधतात, नकळत घराचे सर्वेक्षण करतात आणि नंतर रात्री घर लुटले जाते “
जर जनतेला अशा टोळ्या किंवा संशयास्पद लोक आढळले तर त्यांना विनंती केली जाते की या प्रकरणाची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला द्या.असेही आवाहन पोलिसांनी केल्याचे बातमीच म्हटले आहे.

आम्हाला bangaloremirror ची दखील 31 जुलै 2019 रोजीची बातमी आढळून आली, यात देखील कंबल गॅंगपासून सावध राहण्याच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना केल्याचे म्हटले आहे.

Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, इराणी गॅंगपासून सावध राहण्याचा संदेश लाखनी पोलिसांनी दिलेला नाही, दोन वर्षापुर्वी कर्नाटकातील मंगळुरू पोलिसांनी जारी केलेला फोटो महाराष्ट्र पोलिसांच्या नावाने व्हायरल होत आहे.
Result- Misleading
Our Source
daijiworld.com– https://www.daijiworld.com/news/newsDisplay.aspx?newsID=609748
bangaloremirror – https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/crime/kambali-gang-on-the-prowl-in-city/articleshow/70456985.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा