Monday, December 22, 2025

Fact Check

बिहारमध्ये काँग्रेस पक्षाकडून वितरित केल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सवर राहुल गांधींचा फोटो असल्याचा दावा खोटा

Written By Runjay Kumar, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Jul 8, 2025
banner_image

Claim

image

काँग्रेस पक्षाकडून वाटल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो आहे.

Fact

image

नाही, सॅनिटरी पॅडवर कोणताही फोटो नाही.

बिहार निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिलांना वाटप करत असलेल्या मोफत सॅनिटरी नॅपकिन्सवर राहुल गांधींचा फोटो असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे.

तथापि, आमच्या तपासात आम्हाला आढळले की हा व्हिडिओ रतन रंजन नावाच्या विनोदी कलाकाराने बनवला आहे. रतन रंजनने बाजारातून सॅनिटरी पॅडचे एक पॅकेट विकत घेतले आणि त्यावर काँग्रेसच्या माई बहिन मान योजनेचे पोस्टर चिकटवले आणि त्यात असलेल्या सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो चिकटवला.

व्हायरल व्हिडिओ १९ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सॅनिटरी पॅडचे एक पॅकेट उघडताना दिसत आहे ज्यावर काँग्रेस पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सुरू केलेल्या मै बहीण मान योजनेचे पोस्टर आहे. त्याच वेळी, आतून बाहेर पडणाऱ्या सॅनिटरी पॅडमध्ये राहुल गांधींचा फोटो आहे.

हा व्हिडिओ X वर व्हायरल दाव्यासह शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “काँग्रेसचे लोक वेडे झाले आहेत. बिहार निवडणुकीत जनसंपर्कसाठी त्यांनी मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वाटले पण पॅकेटवर राहुल गांधींचा फोटो छापण्यासोबतच त्यांनी पॅडच्या आत नेताजींचा फोटोही लावला. हे खूप स्वस्त कृत्य आहे!”

Courtesy: X/anujakapurindia

आम्हाला हा दावा मराठी भाषेतून व्हाट्सअपवर व्हायरल होत असल्याचे आढळले.

Fact Check/Verification

सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो असल्याचा दावा करून व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची चौकशी करत असताना, आम्हाला X वर अनेक पोस्ट आढळल्या ज्यात असे म्हटले होते की हा व्हिडिओ रतन रंजन यांनी बनवला आहे.

आम्ही रतन रंजनचे एक्स अकाउंट शोधले तेव्हा आम्हाला तिथे हा व्हिडिओ सापडला नाही, परंतु त्याच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने कबूल केले होते की त्यानेच हा व्हिडिओ बनवला होता.

तथापि, या काळात, रतन रंजनच्या एक्स अकाउंटच्या आर्काइव्हमध्ये शोध घेत असताना, आम्हाला ५ जुलै २०२५ रोजी त्याच्या अकाउंटवरून अपलोड केलेला हा व्हिडिओ आढळला, जो आता डिलीट करण्यात आला आहे.

यानंतर, आम्ही आमच्या चौकशीत रतन रंजनशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी हा व्हिडिओ राजकीय व्यंग्यात्मक हेतूने बनवला आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले पॅकेट त्यांना काँग्रेस पक्षाने दिले नव्हते. उलट, त्यांनी बाजारातून एक सॅनिटरी पॅड विकत घेतले आणि त्यावर प्रथम काँग्रेसच्या माई बहन मान योजनेचे पोस्टर चिकटवले. त्यानंतर, त्यांनी ते पॅकेट फाडले आणि आतील सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो चिकटवला आणि हा व्हिडिओ बनवला.

चौकशीत आम्ही काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी व्हायरल दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले आणि सांगितले की सॅनिटरी पॅडच्या पॅकेटवर राहुल गांधींचा फोटो आहे आणि आत सॅनिटरी पॅडवर कोणताही फोटो नाही. यादरम्यान, त्यांनी आम्हाला एका महिला काँग्रेस कार्यकर्त्याचा सॅनिटरी पॅड पॅक करतानाचा व्हिडिओ देखील पाठवला. त्यात दिसणारे पॅकेट व्हायरल व्हिडिओमधील पॅकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पॅकेटमध्ये राहुल गांधींचा फोटो आहे परंतु आत असलेल्या सॅनिटरी पॅडवर कोणत्याही प्रकारचा फोटो नाही.

आमच्या तपासात, आम्हाला असेही आढळून आले की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा पॅड व्हिस्पर कंपनीचा आहे. रतन रंजन यांनी देखील पुष्टी केली की त्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिस्पर कंपनीचा पॅड घेतला होता.

तर काँग्रेसकडून चालवल्या जाणाऱ्या योजनेत कोणत्याही ब्रँडचे पॅड वापरले जात नाहीत. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या मते, बिहारमध्ये चालवल्या जाणाऱ्या माई बहन मान योजनेअंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या किटमध्ये असलेले सॅनिटरी पॅड बेगुसराय आणि वैशाली जिल्ह्यात तयार केले जात आहेत आणि हे सर्व काँग्रेस पक्षाकडूनच तयार केले जात आहे. यात कोणताही मोठा ब्रँड सहभागी नाही.

व्हायरल दाव्याची चौकशी करताना, न्यूजचेकरने काँग्रेस पक्षाच्या दिल्ली कार्यालयातून सॅनिटरी पॅड असलेले किट देखील मिळवले, जे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालवल्या जाणाऱ्या माई बहन मान योजनेअंतर्गत महिलांमध्ये वितरित केले जात आहे.

आम्हाला आढळले की किटच्या एका बाजूला राहुल गांधींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला प्रियंका गांधींचा फोटो आहे. किटवर काँग्रेसच्या माई बहन मान योजनेचे नाव देखील लिहिलेले आहे आणि त्यावर फोन नंबर देखील आहे. तथापि, किटवर कोणत्याही कंपनी किंवा ब्रँडचे नाव किंवा लोगो नाही. त्याच वेळी, बॉक्सच्या आत असलेल्या पॅकेटमध्ये पाच सॅनिटरी पॅड आहेत आणि त्या सॅनिटरी पॅडवर कोणत्याही प्रकारचा फोटो नाही. तुम्ही या किटचा संपूर्ण व्हिडिओ खाली पाहू शकता.

Instagram will load in the frontend.

व्हायरल दाव्याची आमची चौकशी अजूनही सुरू आहे आणि याच क्रमाने, आम्ही काँग्रेसच्या या योजनेच्या काही लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर ही बातमी अपडेट केली जाईल.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की काँग्रेसकडून वाटल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो असल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ रतन रंजन नावाच्या विनोदी कलाकाराने व्यंग म्हणून बनवला होता आणि यादरम्यान त्याने एका व्यावसायिक पॅडवर राहुल गांधींचा फोटो चिकटवला होता.

Our Sources
Archive of X post by Ratan Ranjan
Telephonic Conversation with Ratan Ranjan
Telephonic Conversation with Congress leader Alka Lamba

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)

RESULT
imageFalse
image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

20,641

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage