Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते.
Fact
हा दावा खोटा आहे. या क्रमांकाची बस बेंगळूरमध्ये सुरु नाही. BMTC ने याचा इन्कार करून दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. असा दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. गुन्हेगारीच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत राज्यकर्त्यांनी प्रवासाची सोय करून दिली आहे. असे हा दावा सांगतो. विधानसौध हे कर्नाटकाच्या विधानसभेला संबोधले जाते तर परप्पन अग्रहार हे बेंगळूर येथील सर्वात जुने केंद्रीय कारागृह आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन काँग्रेसचे सरकार आले. नव्या सरकारच्या योजना आणि निर्णयांवर टीका करणारे अनेक दावे तेंव्हापासूनच सोशल मीडियावर केले जात आहेत. याच क्रमाने हा दावा सध्या व्हायरल झाला आहे.
आम्हाला सोशल मीडियावर हा दावा मागील महिन्यापासून केला जात असल्याचे निदर्शनास आले. X (पूर्वीचे ट्विटर) वर आम्हाला समान दावा करणाऱ्या असंख्य पोस्ट पाहायला मिळाल्या. मूळ पोस्ट इंग्रजी भाषेत असल्याचे आणि त्या आता प्रादेशिक भाषेत भाषांतरित करून व्हायरल होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Newschecker ने व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या फोटोवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला हा फोटो BMTC Volvo Bus या पेजच्या प्रोफाइल पिक्चर मध्ये पाहायला मिळाला.
सदर पेजने हा फोटो 8 मे 2010 रोजी आपले प्रोफाइल म्हणून अपलोड केल्याचे आम्हाला दिसून आले. व्हायरल फोटो आणि या फोटोत आम्हाला बस क्रमांक समान म्हणजेच KA-01 F-3975 असल्याचे निदर्शनास आले. मात्र व्हायरल चित्रात बस चा रूट क्रमांक 420 दर्शविण्यात आल्याचे आणि मूळ चित्रात रूट क्रमांक 365 असल्याचे दिसून आले.
यामुळे आम्ही या फोटो संदर्भात रिव्हर्स इमेज सर्च केला असता, आम्हाला BMTC Volvo Bus ने आपले प्रोफाइल पिक्चर बनविलेला हा फोटो इतर ठिकाणीही पाहायला मिळाला. mangaloremerijaan.com ने 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत आम्हाला हा फोटो पाहायला मिळाला.
risingcitizen या ब्लॉगनेही आपल्या एका ब्लॉगमध्ये हाच फोटो वापरल्याचे आमच्या निदर्शनास आले.
दरम्यान व्हायरल फोटोमध्ये मूळ चित्रात फेरफार केलेली असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही हे फरक शोधण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही चित्रांचे तुलनात्मक निरीक्षण केले असता, मूळ चित्रात बसच्या रूट चे कन्नड मधील नाव नॅशनल पार्क असे आहे. व्हायरल चित्रात हे नाव इंग्रजीत असून विधानसौध टू परप्पन अग्रहार असे करण्यात आले आहे. व्हायरल चित्रात बस चा रूट क्रमांक 420 दर्शविण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो मूळ चित्रात 365 असल्याचे दिसून आले. याचबरोबरीने व्हायरल चित्रात पॉलिटिशन्स स्पेशल असे लिहिण्यात आले असून हा उल्लेख मूळ चित्रात दिसत नाही. हे आपल्याला लक्षात येऊ शकते.
बेंगळूर अहहरात बस सुविधा देण्याचे काम BMTC ही यंत्रणा करते. या यंत्रणेच्या बस रूटची माहिती देणाऱ्या narasimhadatta.info या वेबसाईटवर आम्ही विधानसौध ते परप्पन अग्रहार या मार्गावर बससेवा आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या मार्गावर थेट बस उपलब्ध नसल्याची माहिती आम्हाला मिळाली. किमान दोन बस बदलून आपण विधानसौध ते सदर कारागृहापर्यंतचा प्रवास करू शकतो. अशी माहिती आम्हाला मिळाली.
आम्ही आमच्या न्यूजचेकर कन्नड टीम च्या माध्यमातून BMTC च्या पीआरओ सुनीता यांच्याशी संपर्क साधला असता,” विधानसौध ते परप्पन अग्रहार असा प्रवास करण्यासाठी थेट बस उपलब्ध नाही. असा कोणताही रूट सुरु केलेला नाही.” असे सांगून त्यांनी व्हायरल दाव्याचा इन्कार केला.
यावरून आमच्या तपासात एडिटेड फोटोच्या माध्यमातुन दिशाभूल करणारा दावा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर फोटो कर्नाटकात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपासून इंटरनेट विविध बातम्या, ब्लॉग आणि फेसबुक पेजीस वर उपलब्ध असल्याचेही आमच्या निदर्शनास आले आहे.
कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. एडिटेड फोटोच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला असून बीएमटीसीने ही त्याचा इन्कार केला आहे.
Our Sources
Profile photo uploaded by BMTC Volvo Bus page on May 8, 2010
News published by mangaloremerijaan on November 19, 2021
Blog published by risingcitizen.blogspot on August 15, 2009
Self search on BMTC route search platform
Conversation with PRO of BMTC Sunitha
(Inputs by Ishwarchandra B. G.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
April 24, 2024
Ishwarachandra B G
December 18, 2023
Prasad S Prabhu
June 12, 2023